मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 मार्च 2018 (16:00 IST)

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध, रहाटकरांचा उमेदवारी अर्ज मागे

भाजपाच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. सहा जागांसाठी होणा-या राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवला. त्यामुळे  निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र गुरुवारी  रहाटकर यांनी माघार घेतली. 
 

आता सहा जागांसाठी २३ मार्च रोजी होणारी ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. भाजपकडून प्रकाश जावडेकर, व्‍ही. मुरलीधरन, नारायण राणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून अनिल देसाई तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.