मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 15 मार्च 2018 (15:12 IST)

बारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू? सरकारचा निर्णय

लवकरच आता बारमध्येही एमआरपीप्रमाणे दारू मिळण्याची शक्याता आहे. त्यामुळे अव्वाच्या सव्वा रक्कम आकारून दारू विकणार्‍या बारालकांना चांगला दणका बसणार आहे. पण मद्यपींची चांगलीच चंगळ होणार आहे. उत्पादन शुल्कात 10 टक्के वाढ करण्याचा विचारही राज्य सरकार करीत आहे 
 
राज्यातील महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला सुरू केली असून सर्व बारना एफएल-2 परवाना जारी करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. त्यामुळे आता लवकरच बारमध्ये एमआरपीच्या किमतीनुसार दारू मिळणार आहे. 
 
राज्य सरकारने बार मालकांना एफएल-2 हा परवाना दिल्यास बारमधून एमआरपीच्या दरात दारू मिळेल पण, ही दारू विकत घेतल्यानंतर त्यांना बारमध्ये बसता येणार नाही. ते हवे त्या ठिकाणी मद्यपान करू शकतात, असे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने माध्यमांना सांगितले.