बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

‘पीआरसीआय’च्या कोल्हापूर चॅप्टरची जागतिक परिषदेत घोषणा

कोल्हापूर- पब्लीक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) पुणे येथे झालेल्या बाराव्या जागतिक जनसंपर्क परिषदेत कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चॅप्टरच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा माहिती अधिकारी (रायगड-अलिबाग) व येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
पीआरसीआयची १२वी जागतिक जनसंपर्क परिषद पुण्यात हॉटेल शांताई येथे ९ व १० मार्च रोजी झाली. परिषदेत पीआरसीआयचे मुख्य प्रवर्तक एम.बी. जयराम आणि राष्ट्रीय अध्यक्ष बी.एन. कुमार यांनी कोल्हापूर चॅप्टरच्या कार्यकारिणीची घोषणा केली.
 
कोल्हापूर चॅप्टरची कार्यकारिणी अशी: अध्यक्ष- आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), उपाध्यक्ष- सतीश ठोंबरे (वरिष्ठ व्यवस्थापक, समृद्धी समूह, सांगली), खजिनदार- राजेश शिंदे (संचालक, मीडियाटेक, कोल्हापूर), सचिव- रावसाहेब पुजारी (संपादक व प्रकाशक, तेजस प्रकाशन, कोल्हापूर).
 
पीआरसीआय ही संस्था जनसंपर्क, माध्यम शिक्षण, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, जाहिरात आदी क्षेत्रांत कार्यरत प्रोफेशनल्सची अग्रणी म्हणून राष्ट्रीय पातळीवर पूर्णतः अ-राजकीय व ना-नफा तत्त्वावर कार्यरत आहे. गेल्या बारा वर्षांपासून संस्था जनसंपर्काच्या क्षेत्रात असून देशभरात तीसहून अधिक चॅप्टरच्या माध्यमातून कार्यरत आहे. सन २०१२पासून संवाद व जनसंपर्क अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही संस्थेने यंग कम्युनिकेटर्स क्लब (वायसीसी) ही चळवळ चालवली असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यशाळा, सेमिनार व परिषदांच्या माध्यमातून संवाद व माध्यम क्षेत्रातील अद्यावत प्रवाहांशी अवगत करण्यात येते.