सोमवार, 5 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 मार्च 2018 (15:58 IST)

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

raj thakare and sharad panwar

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते मुंबईतील पेडर रोड येथील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. “शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखतीनंतर भेट झाली नव्हती, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती.”, अशी माहिती स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीय 

गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत, पक्षाची पुढील वाटचालही मांडणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार यांची ‘महामुलाख’ झाली होती. तेव्हापासूनच महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळतील का, अशी चर्चा सुरु होती. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात होती.