1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर

PF detail on SMS and email
कंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे अलर्ट देणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 
 
इपीएफओने सदस्यांसाठी खास सुविधा सुरू केली आहे. सोबतच कर्मचाऱ्यांना मेसेज आणि मेलकरून माहिती देण्याची तरतूद या सुविधेमध्ये आहे. पण या सुविधेसाठी कर्मचाऱ्याचा मोबाइल नंबर आणि इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) बरोबर लिंक होणं गरजेचं आहे. 
 
कामगार मंत्रालयाने याविषयी म्हटलं की, इपीएफओने सदस्यांसाठी सुरू केलेल्या नव्या सुविधेतून त्यांना त्यांच्या खात्यातील पीएफच्या रक्कमेची माहिती एका एसएमएसवर किंवा मिस्ड कॉलवर मिळणार आहे. याशिवाय सदस्य इ-पासबुकही पाहता येईल.