शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (09:01 IST)

रघुचाअंदाज, इन्स्टाग्रामवर घटस्फोट झाल्याचे जाहीर केले

एमटीव्ही च्या रोडीजमध्ये जज म्हणून दिसणाऱ्या रघु राम याने पत्नी सुगंधासोबत आपला घटस्फोट झाल्याचं इन्स्टाग्रामवर जाहीर केलंय. पण त्याचा हे जाहीर करण्याचा अंदाज मात्र हटके आहे. २९ जानेवारी कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं झालेल्या या जोडप्यानं आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. आपल्या पोस्टमध्ये फोटोसोबत रघुनं लिहिलंय, 'काही गोष्टी कधीही बदलत नाही... जसं तुझ्यासाठी माझं प्रेम, जसं आपण एकमेकांसोबत करत असलेली मस्ती. काहीही संपणार नाही. हे केवळ बदलेल आणि एक नवा अध्याय सुरू होईल' यासोबत रघुनं #FriendshipGoals #DivorceGoals हे हॅशटॅग वापरलेत.