सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (16:05 IST)

सरकारकडून JEE आणि NEET साठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी

उच्च शिक्षणासाठी पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी म्हणजे 2019 पासून सरकारकडून मोफत क्लासची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे JEE आणि NEET सारख्या परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी घेणे शक्य होणार आहे. 
 
यासाठी JEE आणि NEET च्या अभ्यासक्रमांच्या मोफत क्लास साठी एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) आपल्या 2 हजार 697 सराव केंद्रांना दोन वर्षांत शिक्षण केंद्रांमध्ये परिवर्तीत करणार आहे. ही शिक्षण केंद्रे 8 सप्टेंबरपासून सुरू होतील. या केंद्रामधून मे 2019 पासून शिकवण्या सुरू होतील. पहिल्या फेरीत एनटीए जेईई-मेन या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेईल. जे विद्यार्थी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळांवरून एनटीएसाठी नोंदणी करतील त्यांना NEETUG आणि JEE द्वारे आयोजित होणाऱ्या सराव परीक्षेत सहभागी होता येईल. त्याबरोबरच या विद्यार्थ्यांना एनटीएच्या शिक्षकांबरोबर चर्चाही करता येईल. त्यामुळे अभ्यासात झालेल्या चुका समजण्यास त्यांवा मदत होणार आहे.