1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (12:10 IST)

Guru Pushya Yoga 2021: गुरु-पुष्य का शुभ संयोग, महत्व आणि खास मुहूर्त

Guru Pushya Yoga 2021
कोणतीही वस्तू शुभ करण्यासाठी योग चांगले असावे अशात गुरु-पुष्य योग शुभ मानला गेला आहे. वर्ष 2021 मधील दुसरा गुरु-पुष्य नक्षत्र योग 25 फेब्रुवारी 2021, गुरुवारी आहे. गुरु-पुष्य योग सर्व प्रकाराच्या खरेदीसाठी शुभ मानला गेला आहे. या दिवशी स्वर्ण, चांदीचे दागिने, रत्न, वस्त्र, स्थायी संपत्ति जसे भूमी, भवन, वाहन इतर क्रय करणे शुभ मानले जाते. गुरु-पुष्यात खरेदी केलेल्या वस्तू स्थायी असतात अशा विश्वास आहे.
 
गुरु-पुष्य शुभ संयोग व मुहूर्त
24 फेब्रुवारी दुपारी 12.30 वाजेपासून ते गुरुवार, 25 फेब्रुवारी दुपारी 1.18 मिनिटापर्यंत राहील. 
 
25 फेब्रुवारी शुभ मुहूर्त- 
सकाळी 06:55 ते दुपारी 01:17 पर्यंत अमृतसिद्धि, सर्वार्थसिद्धि व गुरु-पुष्य योग खास संयोग
 
महत्व- 
गुरुवारी पुष्य नक्षत्र असणे शुभ फल देणारे मानले गेले आहे. या दिवशी केलेल्या कार्यांचे उत्तम परिणाम प्राप्त होतात. गुरुवाचा पूर्ण दिवस खरेदीसाठी श्रेष्ठ आहे. या दिवशी श्रीयंत्र, पारद शिवलिंग आणि श्वेतार्क गणपतीची साधना विशेष फलदायी ठरते.
 
ज्योतिष शास्त्र खास महत्त्व- 
ज्योतिष शास्त्रात ग्रह, नक्षत्र, वार, करण, तिथी, मास अनेक महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या प्रभाव आणि युतीमुळे शुभ- अशुभ वेळेचा निर्माण करतात. ज्यामुळे मानव इच्छित कार्यांमध्ये उच्च यश प्राप्ती होते. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात या योगाचे महत्त्व आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले गेले आहे.