सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

होळीवर बदलणार अनेक लोकांचे भाग्य, वाचा आपल्या राशीबद्दल

कोणत्याही सणाचे आपल्यावर आणि आपल्या ग्रहांवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. जाणून घ्या रंगाच्या या सणाचा आपल्या राशीवर काय प्रभाव पडत आहे:
 
मेष
कार्य क्षेत्रात परिश्रमाचा लाभ मिळेल. सरकाराकडून सन्मानाचे योग बनत आहे.
 
वृषभ
पदोन्नतीचे योग आहे. पद व प्रतिष्ठेत वृद्धी होण्याची शक्यता आहे. भाग्य उजळेल.
 
मिथुन
शत्रुवर्ग प्रभावहीन होईल. साहस वाढेल. भाऊ-बहिणींसाठी जरा परिश्रम करावे लागणार.
 
कर्क
कुटुंबात वाद घडू शकतो. आर्थिक दृष्ट्या शुभ संकेत आहे. धनाची बचत होऊ शकते. करिअरचे योग उत्तम आहे.
 
सिंह
व्यक्तित्व सुधारेल. आरोग्य दृष्ट्या समय उत्तम व्यतीत होईल. यशाची पायरी गाठाल.
 
कन्या
शत्रूवर वरचढ राहाल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात निर्णय आपल्या पक्षात येण्याची शक्यता आहे.
 
तूळ 
समाजाच आपली प्रतिष्ठा वाढेल. संतानाच्या आरोग्याकडे लक्ष असू द्यावे. चारीबाजूला प्रशंसा होईल. प्रगतीचे योग आहे.
 
वृश्चिक
आपण खाजगी जीवनासाठी वेळ देऊ पात नसल्यामुळे कुटुंबातील सदस्य तक्रार करू शकतात. नोकरीत मात्र इच्छित पदोन्नतीचे योग आहे.
 
धनू
भाग्यात वृद्धी होईल. मन प्रसन्न राहील. वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. भाग्यशाली वेळ आहे.
 
मकर
स्वत:च्या वाणीवर ताबा ठेवा. अनुकूल वातावरण राहावे याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकाराचे वाद टाळा. देण-घेण सांभाळून करा.
 
कुंभ
जीवनसाथीसोबत कोणत्याही प्रकाराची वादाची स्थिती टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या. अचानक लाभ प्राप्तीचे योग आहे. भाग्य उजळेल.
 
मीन
यश मिळण्याची शक्यता आहे. अधिक परिश्रम केल्याने उत्तम परिणाम दिसून येतील. प्रवासाचे योग आहे.