शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Updated : मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (11:11 IST)

वर्ष 2021 ची कुंडली काय म्हणते, नवे वर्ष कसे असणार जाणून घ्या

यंदाचे वर्ष 2020 आपल्याला बरीच काही शिकवण देऊन जात आहे. वर्ष 2020 मध्ये कोरोनाच्या साथीने संपूर्ण जगाला खूप त्रास दिला. अशी अपेक्षा बाळगली जात आहे की येणारे वर्ष 2021 आपल्या सह अनेक प्रकाराचे आनंद घेऊन येणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या की येणारे वर्ष 2021 कसे असणार..
 
वर्ष 2021 ची सुरुवात कर्क रास आणि कन्या लग्नापासून होत आहे. चंद्रमा पुष्य नक्षत्रात आणि लग्न हस्त नक्षत्रात असल्यानं येणारे वर्ष साफल्य आणि प्रगतीचे सूचक असल्याचे दिसत आहे. 
 
वर्ष कुंडली 2021 च्या मते, वर्षाचे स्वामी बुध आपल्या घरापासून चवथ्या घरात मित्र रास सूर्यासह आहेत. नक्कीच हे वर्ष 2021 सर्वांसाठी चांगले परिणाम घेऊन येणारे ठरणार आहे. येणारे वर्ष 2021 नवीन शोध, नवीन व्यवसाय, नवीन कल्पना, प्रगती आणि उत्साहाने पुढे जाणार आहे. 
 
ग्रहांच्या मोजणीनुसार वर्ष 2021 गेल्या वर्षीच्या अपेक्षा चांगले दिसून येत आहे. चांगले परिणाम आणि चांगले निकाल आपल्या सामोरी येणार आहे. आपण जे काम करणार आहोत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
 
वर्ष 2020 मध्ये राहू खूप बळकट होता आणि बऱ्याचशा वाईट घटना देखील घडल्या होत्या पण येणारे वर्ष 2021 चे सितारे असे सांगत आहे की या वर्षात आयुष्य द्रुतगतीने सामान्य होईल.
 
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, वर्षाची सुरुवात काही राशींसाठी चांगली नसणार. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर मिथुन रास, वृश्चिक रास आणि धनू राशीच्या लोकांना या वर्षाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
 
हे वर्ष मेहनत करणाऱ्या लोकांसाठी उत्कृष्ट परिणाम देणारे आहे. चुकीच्या लोकांचे कट-कारस्थान सामोरं येतील. अनेक रहस्यं प्रकट होतील. या वर्षी चांगले काम करणाऱ्यासाठी चांगले परिणाम मिळतील. त्यांचे नशीब उजळून निघेल. न्यायायलीन खटलाच्या प्रकरणांमध्ये विजय मिळेल आणि ज्यांना शनीच्या साढेसाती मुळे त्रास होता त्यांना आराम मिळेल.