शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (10:09 IST)

कशी ओळखाल आपली रास?

रास ओळखण्यासाठी जन्मकुंडली म्हणजे जन्मवेळेचा आकाशातल्या ग्रहांचा नकाशा याची गरज असते. जन्मकुंडलीत तीन रास महत्त्वाच्या मानल्या जातात.
 
लग्न रास: पहिली असते लग्न रास. जेव्हा आपला जन्म झाला त्यावेळी आकाशात पूर्व क्षितिजावर जी रास उगवली होती, ती आपली लग्न रास.
 
रविरास: जन्म कुंडलीत आपला ज्या राशीत आहे, ती आपली रविरास.
 
चंद्र रास: भारतीय ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी सर्वात गतिमान ग्रह मानला जातो. गोचरीच्या या चंद्राचे इतर ग्रहांशी जे अंशात्मक योग होतात, त्यावरून आपलं भविष्य सांगितलं जातं.