रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 एप्रिल 2023 (07:16 IST)

अचानक धन हवे असेल तर शुक्रवारी देवीचे करा रहे उपाय

money
अपार धनप्राप्तीची इच्छा प्रत्येक माणसामध्ये असते. पण हे धन तुम्हाला तुमची इच्छा आहे म्हणून मिळत नाही. त्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे.  
 
आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगतो ज्याने तुम्ही लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून धनवान व्हाल... 
 
लाल दोर्‍यात सातमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण केल्याने धनप्राप्ती होते.   
 
सव्वा पाच किलो आटा आणि सव्वा किलो गूळ घ्या. दोघांचे मिश्रण करून पोळ्या तयार करा. शुक्रवारी संध्याकाळी गायीला ह्या पोळ्या खाऊ घाला. तीन शुक्रवारापर्यंत हे कार्य केल्याने दरिद्रता दूर होते.   
 
ॐ श्री ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः। या मंत्राची कमलगट्टेच्या माळेचा रोज जप केलातर ऋणमुक्ती होण्यास मदत मिळते.   
 
लक्ष्मीच्या फोटोसमोर 11 दिवसांपर्यंत अखंड ज्योत (तेलाचा दिवा) लावा. 11व्या दिवशी 11 कुमारिकांना भोजन करवून एक शिक्का आणि मेंदीच पॅकेट द्या.