बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (09:47 IST)

काय सांगता, चिमूट भर तांदूळ आपले नशीब बदलणार

तांदूळ म्हणजे अक्षता आपल्या ग्रंथांमधील सर्वात पवित्र धान्य मानले जाते. जर पूजेमध्ये कोणत्याही साहित्याची कमतरता असल्यास तर त्या साहित्याचे नाव घेऊन तांदूळ किंवा अक्षता अर्पण करतात. कोणते न कोणते साहित्य कोणत्या न कोणत्या देवाला अर्पण करणं निषिद्ध असतं जसे तुळशीला कुंकू वाहू शकत नाही. शंकराला हळद वाहू शकत नाही. गणपतीला तुळस वाहू नये तर दुर्गेला दूर्वा वाहत नाही पण तांदूळ प्रत्येक देवाला वाहिले जातात.

चला तर मग तांदळाशी संबंधित काही खास माहिती जाणून घेऊ या.
 
* देवाला तांदूळ वाहण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तांदूळ तुटलेले नसावे. अक्षता हे पूर्णतेचे प्रतीक आहे म्हणून सर्व तांदूळ अखंड असावे. तांदुळाचे फक्त 5 दाणे देवाला दररोज वाहिल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते.
 
* तांदूळ स्वच्छ असावे. शिवलिंगावर तांदूळ वाहिल्याने शंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भाविकांना अखंड तांदुळाच्या प्रमाणे अखंड संपत्ती, मान सन्मान मिळवून देतात.
 
* घरात आई अन्नपूर्णेच्या मूर्तीला तांदुळाच्या ढिगाऱ्यावर स्थापित करावे. आयुष्यभर धन आणि संपत्तीची कमतरता भासत नाही.
 
* पूजेच्या वेळी अक्षता या मंत्रासह देवाला अर्पण करतात. 
अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकमाक्ता: सुशोभिता:
मया निवेदिता भक्त्या: गृहाण परमेश्वर
 
या मंत्राचा अर्थ असा आहे की हे देवा पूजेत कुंकूंच्या रंगाने सुशोभित केलेली ही अक्षतारूपी पूजा आपल्यासाठी अर्पण करत आहे, आपण याचा स्वीकार करावा.
 
अन्नात अक्षता म्हणजे तांदूळ हे श्रेष्ठ मानले आहे. याला देवान्न देखील म्हणतात. देवांचे आवडते धान्य तांदूळ आहे. याला सुवासिक द्रव्य कुंकूसह आपल्याला अर्पण करत आहोत याला स्वीकारून आपण आपल्या भक्ताच्या भावनांना समजावं.
 
* पूजेत अक्षता वाहण्याचा हेतू असा आहे की आमची पूजा अक्षता प्रमाणेच पूर्ण व्हावी. अन्नात श्रेष्ठ असल्यामुळे देवाला अर्पण करताना ही भावना असते की जे पण काही आम्हाला मिळत आहे ते आपल्या अर्थात देवाच्या कृपेनेच मिळत आहे.
 
* म्हणून आपल्या मनात ही भावना बनून राहावी. याचे पांढरे रंग शांतीचे प्रतीक आहे. म्हणून आपल्या प्रत्येक कार्याची पूर्णता अशी असावी की त्याचे फळ आपल्याला शांती देतील. म्हणून पूजेत अक्षता एक अत्यावश्यक साहित्य आहे.
 
* तांदुळाचे 5 दाणे देखील तेवढेच फळ देतात जेवढे चिमूटभर तांदूळ किंवा एक मूठ तांदूळ... श्रीमंतपणाच्या सर्व कठीण उपायांपेक्षा श्रेष्ठ आहे चिमूटभर तांदूळ. आपल्या पूर्ण भक्तीने श्रद्धेने आपण दररोज आपल्या इष्ट देवाला किंवा देवीला अर्पण करावे आणि चमत्कार बघावे.