बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

गुळाचे चमत्कारी उपाय....भय-संकट दूर करेल

गुळात गोडवा असल्याने स्वादिष्ट तर असतं तसेच आरोग्यासाठी देखील गुळाचे आपलं महत्त्व आहे. या व्यतिरिक्त गूळ संकटांपासून बचाव करतो हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी जाणून घ्या गुळाचे उपाय काय आहे ते... 
 
पहिला उपाय
कोणत्याही प्रकाराची भीती असल्यास तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून हनुमानाच्या मंदिरात दान करावे. तेथे बसून धूप-दीप लावून हनुमान चालीसाचा पाठ करावा. हा उपाय काही मंगळवार आणि शनिवार करा. नंतर आपल्या श्रद्धानुसार उपाय अमलात आणा. याने सर्व प्रकाराचे भय दूर होतील.
 
दुसरा उपाय 
पत्रिकेत सूर्य कमजोर असल्यास गूळ खाऊन पाणी पिऊन कार्य आरंभ करावे. वाहत्या पाण्यात गूळ प्रवाहित करावे. 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ रविवारपासून 8 दिवसापर्यंत मंदिरात भेट करावे. सूर्य द्वादश भाव मध्ये असल्यास माकडांना गूळ खाऊ घालावे.
 
तिसरा उपाय
स्थायी संपत्ती हेतू अर्थात स्वत:चे घर हवं असल्यास गुळाचे हे तीन उपाय अमलात आणावे. 
प्रत्येक शुक्रवारी नियमाने उपाशी व्यक्तीला भोजन करून त्याला गूळ खाऊ घालावे. 
एखाद्या रविवारी गायली गूळ खाऊ घालावे. 
शनिवारी शनी मंदिरात सावली दान करून गुपचुप गूळ ठेवून यावे.
असे नियमित केल्याने अचल संपतीचे योग बनतील.
 
चौथा उपाय
मनोकामना पूर्ण करण्यासाठी 7 गुळाची ढेप, एक रुपयाचा शिक्का आणि हळदीच्या 7 अख्ख्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून गुरुवारी रेल्वे लाइन्सच्या पलीकडे फेकून द्याव्या. फेकताना प्रार्थना करा. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील.
 
पाचवा उपाय
आहारात गुळाचा प्रयोग आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. परंतू जरा जरा गूळ खात राहिल्याने धनाची आवक वाढते. हनुमान मंदिरात गूळ-चणे हनुमानाच्या चरणी अर्पित करून ऋणमोचक मंगल स्तोत्राचा पाठ करावा. लगेच लाभ दिसून येईल.
 
सहावा उपाय
झोप येत नसल्यास बेडरुमध्ये दोन किलो पांढरा गूळ लाल कपड्यात गुंडाळून ठेवावा.
 
सातवा उपाय
भाऊ-बहीण संबंधी समस्या असल्यास सव्वा किलो गूळ जमिनीत दाबून ठेवल्याने आपसात समजूत होते. हा उपाय मंगळवारी करणे योग्य ठरेल. तसेच हा उपाय लाल किताब जाणकार व्यक्तीला विचारून करावा कारण कुंडलीत मंगल आणि सूर्याची स्थिती बघून निर्णय घेता येईल.
 
आठवा उपाय
नोकरी प्राप्तीसाठी साक्षात्कार देण्यासाठी जाताना रस्त्यात एखाद्या गायीला कणीक आणि गूळ खायला द्यावे, यश मिळेल.