शनिवार, 28 जानेवारी 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (15:23 IST)

2023 पर्यंत या 3 राशींवर केतूची राहील कृपा, करिअरमध्ये मिळेल भरघोस यश

राहू-केतू हे ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जातात.राहू-केतू नेहमी एकाच अक्षात फिरत असतात.केतूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे दीड वर्षे लागतात.या वर्षी केतूने 12 एप्रिलला वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश केला.केतू आता 2023 पर्यंत या राशीत राहील.ज्योतिषशास्त्रानुसार केतू राशीच्या बदलामुळे येणारे वर्ष काही राशींसाठी शुभ राहील.जाणून घ्या या राशींबद्दल-
 
सिंह- केतू सिंह राशीच्या लोकांसाठी तृतीय भावात गोचर करत आहे.या काळात तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल.काही काळापासून तुम्हाला भेडसावत असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.तुमची कार्यशैली सुधारेल.वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते.
 
कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी 2023 पर्यंतचा काळ शुभ राहणार आहे.या दरम्यान तुमचा आत्मविश्वास वाढेल.तुम्ही सक्रिय आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल.हा काळ तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देईल. 
 
धनु - धनु राशीच्या लोकांसाठी अकराव्या भावात केतूचे भ्रमण आहे.केतूच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना राजकारणात फायदा होईल.या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.धनलाभ होईल.नोकरीत बदलासाठी चांगला काळ.