शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

Dhan Yoga in Kundali : धनाशी निगडित गोष्टी सांगतात पत्रिकेतील हे 7 योग

भविष्य जाणून घेण्यासाठी कुंडली अध्ययन एक श्रेष्ठ उपाय मानला जातो.  जन्म कुंडलीतील दुसरा घर किंवा भाव धनाचा असतो. या भावातून धन, खजाना, सोनं-चांदी, हिरे-मोती इत्यादी गोष्टींवर विचार करण्यात येतो. तसेच या भावामुळे हे माहीत होत की व्यक्तीजवळ किती स्थायी संपत्ती राहणार आहे. तर जाणून घ्या या भावाशी निगडित 7 योग…
 
1. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय भावात शुभ ग्रह स्थित असेल किंवा शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर अशा व्यक्तींना भरपूर धनप्राप्ती होते.  
 
2. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या दुसर्‍या भावात बुध असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल, तर तो व्यक्ती नेहमी गरीब राहतो. असे लोक फार प्रयत्न करतात पण त्यांच्या नशिबात धन एकत्र करणे नसत.  
 
3. जर पत्रिकेत दुसर्‍या भावात एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल, तर तो व्यक्ती धनहीन होऊ शकतो. ह्या लोकांनी बराच परिश्रम केला तरी देखील यांना पैशाची तंगी असते.  
 
4. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत दुसर्‍या भावात चंद्र स्थित असतो तर तो व्यक्ती फारच धनवान असतो. त्याच्या जीवनात एवढं धन असत की त्याला कुठल्याही सुख-सुविधेसाठी जास्त परिश्रम करावा लागत नाही.  
 
5. जर जन्म पत्रिकेत दुसर्‍या भावात चंद्र असेल आणि त्यावर नीचच्या बुधाची दृष्टी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या परिवाराचे धन देखील नष्ट होऊन जात.  
 
6. जर पत्रिकेत चंद्र एकटा असेल आणि त्याच्यासोबत कुठलेही ग्रह द्वितीय किंवा द्वादश नसतील तर तो व्यक्ती जन्मभर गरीबच राहतो. अशा व्यक्तीला जन्मभर श्रम करावे लागतात, पण तरी देखील तो जास्त पैसा कमावू शकत नाही.  
 
7. जर जन्मपत्रिकेत सूर्य आणि बुध द्वितीय भावात स्थित असेल तर अशा व्यक्तीजवळ देखील पैसा टिकत नाही.