शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जानेवारी 2021 (09:05 IST)

लाल किताबानुसार सोनं कुठे घालावे, जाणून घेऊ या 14 खास गोष्टी

काही लोक गळ्यात सोन्याची साखळी घालतात तर काही लोक बोटात अंगठ्या घालतात तर काही लोक हातात ब्रेसलेट घालतात आणि काही लोक अशी असतात जी संपूर्ण शरीरावर सोनं एकत्रच घालतात. परंतु त्यांना माहिती नाही की लाल किताबानुसार सोनं कुठे घातल्यानं काय प्रभाव पडतो. 

लाल किताबानुसार सोनं आपले भाग्य चमकवू पण शकते आणि खराब देखील करू शकते. म्हणून हे नेहमी विचारपूर्वक घातले पाहिजे. या साठी आपण आपल्या कुंडलीनुसारच सोनं घालावे. लाल किताबानुसार सोनं हे बृहस्पतीचा घटक मानला आहे. 
 
लाल किताबानुसार ...
1 गळ्यात सोनं घालण्याचा अर्थ आहे की आपल्या पत्रिकेत बृहस्पती लग्नघरात बसून प्रभाव देणार. म्हणजे कुंडली किंवा पत्रिकेत बृहस्पती कोणत्याही घरात आहे तर तो पहिल्या घराचा प्रभाव देईल. चवथ्या घरात बृहस्पती उच्च असेल तर लग्न घरात जाऊन तो सामान्य श्रेणीचा होईल.
 
2 हातात सोनं घातल्यानं आपल्या पत्रिकेत बृहस्पती तिसऱ्या भावात म्हणजे पराक्रमात सक्रिय भूमिकेत असेल. मग सोनं हातात अंगठी किंवा ब्रेसलेट म्हणून घाला.
 
3 सोन्यासह खोटे दागिने किंवा इतर धातूचे दागिने घातले असतील तर हे बृहस्पतीच्या प्रभावाला खराब करतो. म्हणून सोनं घालावयाचे आहे की नाही हे एखाद्या जाणकार ज्योतिषाला विचारूनच घालावं.
 
4 जर पत्रिकेत आपले लग्न मेष, कर्क, सिंह आणि धनु आहे तर आपल्यासाठी सोनं घालणे चांगले आहे.
 
5 वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ लग्न असल्यास सोनं घालणे चांगले नाही.
 
6 तूळ आणि मकर लग्नाच्या लोकांना सोनं कमी घालायला पाहिजे.
 
7 वृश्चिक आणि मीन लग्न असणाऱ्यांना सोनं घालणे मध्यम आहे.
 
8 ज्या लोकांच्या पत्रिकेत बृहस्पती खराब आहे किंवा कोणत्याही प्रकाराने दूषित असल्यास त्यांनी सोन्याचा वापर करणं टाळावं.
 
9 कंबरेत सोनं घालू नये या मुळे पचन क्रिया खराब होऊ शकते. पोटाच्या व्यतिरिक्त गर्भाशय आणि गर्भाशयाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना पोटाचे त्रास आहे किंवा लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी सोनं घालू नये.
 
10 जे लोक लोखंडाचा, कोळशाच्या किंवा शनीशी संबंधित कोणत्याही धातूचा वापर करीत असतील तर त्यांनी सोनं घालू नये.
 
11 सोनं डाव्या हातात घालू नये. डाव्या हातात तेव्हाच घाला जेव्हा विशेष गरज असेल. डाव्या हातात सोनं घातल्यानं त्रास सुरू होतात.
 
12 पायात सोन्याचे जोडवे किंवा पायल किंवा एंकलेट्स घालू नये कारण ही धातू खूप पवित्र आहे. जी बृहस्पतीची धातू आहे. पायात घातल्यानं वैवाहिक जीवनात त्रास संभवतात.
 
13 जर आपण सोनं घातले आहे तर मांसाहार आणि मद्यपानाचे सेवन करू नये. असं केल्यानं आपण अडचणीत येऊ शकता. सोनं बृहस्पतीचा पवित्र धातू आहे आणि त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे.
 
14 सोनं झोपताना उशाशी ठेवू नये. बऱ्याच लोकांना सवय असते की ते अंगठी किंवा गळ्यातील साखळी काढून उशाखाली ठेवतात. या मुळे झोपेशी निगडित समस्या आणि इतर समस्या उद्भवू शकतात.