शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (14:41 IST)

29 सप्टेंबर 2020 ला शनि होत आहे मार्गी, जाणून घ्या बचावाचे उपाय

24 जानेवारीला शनीने धनू ते मकर रास यात गोचर केले होते. नंतर 11 मे रोजी ते व्रकी झाले आणि आता 29 सप्टेंबरला पुन्हा मार्गी होणार. अशात लाल किताबमध्ये यापासून बचावासाठी उपाय सांगण्यात आले आहे.
 
ज्योतिष शास्त्रात शनी राशी परिवर्तन एक मोठी घटना आहे. शनी प्रत्येक 30 वर्षात आपली राशी चक्र पूर्ण करतं. यानुसार शनी प्रत्येक अडीच वर्षात एक राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतात. 24 जानेवारीला शनीने मकर राशीत प्रवेश केले होते ज्यामुळे कन्या आणि वृषभ राशीहून हटून मिथुन आणि तूळ राशीवर ढय्या प्रारंभ झाली होती. शनीच्या या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रथम चरण सुरू झाला होता.
 
नंतर 11 मे पासून 29 सप्टेंबर पर्यंत शनी मकर राशीत राहून वक्री अवस्थेत गोचर केले. शनी आता पूर्ण 142 दिवसांनंतर 29 सप्टेंबरला सकाळी 10 वाजून 45 मिनिटावर वक्री ते मार्गी होत आहे.
 
शनीच्या वाईट प्रभावापासून बचावासाठी हे उपाय करा-
 
1. व्यवसायात लाभ हेतू काळा सुरमा जमिनीत दाबून द्यावा.
2. पोळीवर मोहरीचं तेल लावून कुत्र्याला खाऊ घालावं.
3. शनिवारी शनी मंदिरात सावली दान करावी.
4. तीळ, उडीद, लोखंड, तेल, काळे वस्त्र आणि जोडे दान करावे.
5. आचरण शुद्ध ठेवावे. मांस-मदिराचे सेवन करू नये.
6. जुगार खेळणे टाळावे. व्याज संबंधित व्यापार करू नये. 
7. आपल्या साथीदाराशी निष्ठावंत राहावे.
8. दररोज हनुमान चालीसा पाठ करावा.
9. दात स्वच्छ ठेवावे.
10. नेहमी मंदिरात जाताना डोकं झाकावे.
11. खोटी साक्ष देऊ नये.
12. वडील आणि पुत्र यांचा अपमान करू नये.
13. नास्तिक आणि नास्तिकतेच्या विचारांपासून दूर राहावे.
14. भैरव बाबाला मदिरा अर्पित करावी.
15. कावळ्याला आणि कुत्र्याला दररोज पोळी खाऊ घालावी.
16. आंधळे, अपंग, सेवक आणि सफाई कर्मचार्‍यांना खूश ठेवावे आणि त्यांना मदत करावी.
17. मधाचे सेवन करावे आणि मधात काळे तीळ मिसळून मंदिरात दान करावे. तसेच घरात नेहमी मध असू द्यावे.