बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 28 सप्टेंबर 2020 (09:29 IST)

नशीब बदलणारे 5 स्वप्न, आपल्या यापैकी कोणतं स्वप्न पडलं?

स्वप्न तर सर्वानांच येत असतात, कधी चांगले तर कधी वाईट. स्वप्न अखेर असतात तरी काय ? आपल्या आयुष्याशी त्यांचा काय संबंध असतो असे बरेचशे प्रश्न मनात येतात. आज आम्ही आपल्याला अश्या काही स्वप्नांबद्दल सांगत आहोत ज्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर पडू शकतो. चला तर मग जाऊ या स्वप्नांच्या देशात.
 
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न हे आपल्याला भविष्यातील घटनांबद्दल सूचित करतात. प्रत्येक स्वप्नाचा एक स्वतःचा अर्थ असतो. काही स्वप्न आपल्या वाईट संकेत देतात, तर काही स्वप्नाचा संबंध आपल्या भविष्यातील सौख्य आणि यश यासोबत असतो. जर कधी आपण हे 5 स्वप्न बघता. तर हे आपल्यासाठी शुभ सूचक आहे.
 
1 स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात आपण गाय बघितली असल्यास तर आपल्यासाठी हे शुभ सूचक आहे. असे म्हणतात की ज्या माणसाला जीवनात देवाची कृपा मिळते त्याचे जीवन सत्कारणीला लागतं. स्वप्नात गाय बघणं हे सौख्य आणि समृद्धीचे सूचक आहे.
 
2 जर एखादा माणूस स्वप्नात सफरचंद बघतो तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला त्याचा कार्यक्षेत्रात फायदा होणार आहे. अश्या माणसाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये बढती मिळणार आहे. तसेच एखादी विवाहित स्त्रीने स्वप्नात सफरचंद बघितले असल्यास तिला संतान सुख मिळणार आणि अपत्य यश आणि समृद्धी मिळवेल अशी आख्यायिका आहे.
 
3 आपण स्वप्नात फुलांनी बहरलेले झाड किंवा केळीच्या फुलाचे झाडं बघितल्यावर हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्याची वेळ आली आहे आणि या पुढे आपल्या सह चांगलेच होणार.
 
4 स्वप्नात एखाद्या तीर्थक्षेत्राला बघितले असल्यास हे फार शुभ स्वप्न असतं असे म्हणतात की आपला येणार काळ दैवीय कृपेने भरलेला असेल. असे म्हणतात की ज्या देवी किंवा देवाचे तीर्थक्षेत्र आपल्याला स्वप्नात दिसतात, त्या देवी आणि देवांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो.
 
5 जर का आपण स्वप्नात स्वतःला एखाद्या उंच स्थळी बघता किंवा पायऱ्या चढताना बघता, तर समजावे की लवकरच आपण आपल्या वास्तविक आयुष्यात यशाच्या पायरीवर चढणार आहात. आणि आपली कार्यक्षेत्रात आणि नोकरीत बढती होऊ शकते.