मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (08:11 IST)

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या राहू काळ

ज्योतिष शास्त्रात राहू काळ अशुभ असल्याचे मानले गेले आहे. म्हणून या काळात शुभ कार्य केले जात नाही. भारतीय ज्योतिषात नऊ ग्रह आहेत- सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, राहु आणि केतू. ज्यापैकी राहू राक्षसी सापाचा प्रमुख आहे. हिंदू शास्त्रात सूर्य-चंद्राला गिळून ग्रहण उत्पन्न करतो.
 
राहु तमस असुर आहे. राहूला मेंदू नसून हा ग्रह आठ काळ्या घोड्यांच्या रथावर स्वार आहे. येथे प्रस्तुत आहे आठवड्यातील दिवसांवर आधारित राहू काळाची वेळ, जी बघून आपण दैनिक कार्य करु शकतात.
 
रविवार : संध्याकाळी 4:30 ते 6:00
 
सोमवार : सकाळी 7:30 ते 9:00
 
मंगळवार : दुपारी 3:00 ते 4:30
 
बुधवार : दुपारी 12:00 ते 1:30
 
गुरुवार : दुपारी 1:30 ते 3:00
 
शुक्रवार : सकाळी 10:30 ते दुपारी 12:00
 
शनिवार : सकाळी 9:00 ते 10:30