घरासमोर या वस्तू असणे अशुभ, त्वरित निराकरण करा
वास्तू शास्त्रानुसार घरात वास्तू दोषाशी निगडित कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरी जावं लागत. वास्तुशास्त्रानुसार घरातच नव्हे तर घराच्या बाहेर देखील अनेक प्रकारचे वास्तू दोष बघायला मिळतात. वास्तू दोष असल्यावर आर्थिक त्रास, कौटुंबिक जीवनात कलह आणि मानसिक त्रास होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेर आणि जवळपास या काही गोष्टी नसाव्यात.
1 असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेश द्वाराने सर्व प्रकारचं सौख्य समृद्धी आणि भरभराटी येते. अश्या परिस्थितीत घराच्या बाहेर घाण पाणी साचू नये. वास्तुनुसार जर हे पाणी घराच्या पश्चिम दिशेला साचले असल्यास धनहानी आणि अपयशाची भीती असते.
2 घराच्या बाहेर कधीही काटेरी झुडूप लावू नये. घराच्या समोर काटेरी झाड असल्यानं आपल्या शत्रूंची संख्या वाढते. तसेच कौटुंबिक मतभेद आणि आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडतो.
3 घराच्या बाहेर कचरा कुंडी नसावी किंवा कचरा साठू देऊ नये. वास्तू शास्त्रानुसार हे कष्टदायी आणि पैशांचे नुकसान होण्याचे सूचक आहे.
4 मुख्य दारा समोर विद्युत खांब प्रगतीस अडथळा मानले जाते.
5 घराच्या पुढे घनदाट झाड नसावे. हे वास्तुदोषाला कारणीभूत असतो.
6 घराच्या पुढे वेल चढणे अशुभ मानले जाते. वास्तू विज्ञानानुसार हे विरोधक आणि शत्रूंच्या संख्येला वाढवते जे प्रगतीत अडथळा आणते.
7 वास्तुनुसार घराच्या उंबऱ्यावर म्हणजे मुख्य दारापासून उंच रास्ता असणं कष्टदायी आहे.
8 वास्तुशास्त्रानुसार ज्या झाडांमध्ये नेहमीच दुधासारखे काही द्रव्य बाहेर पडत असल्यास त्याला घराच्या मुख्य दारावर कधी ही लावू नये.