मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (14:29 IST)

भाग्यवान असतात या राशीचे लोक, कमी वयात होतात श्रीमंत

ज्योतिष्य शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचं भाग्य त्यांच्या जन्मावेळी असलेल्या ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांप्रमाणे निश्चित होते. प्रत्येक नवजातचे नाव त्याच्या जन्म वेळ, दशा नक्षत्र आणि ग्रहांच्या स्थितीप्रमाणे ठेवण्यात येतं म्हणून राशीचं व्यक्तीच्या जीवनात वेगळंच महत्त्व असतं. राशीद्वारे व्यक्तीचा स्वभाव तसेच भविष्याबद्दल आकलन केलं जातं. अशात 12 पैकी काही राशी अश्या आहेत ज्यांचे जातक भाग्यवान ठरतात आणि कमी वयातच धन प्राप्ती करतात. जाणून घ्या त्यापैकी आपली रास आहेत का-
 
मेष
मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळाचा मेष राशीवर विशेष प्रभाव आणि कृपा असते. ज्यामुळे या राशीचे लोक जे काम हातात घेतात त्या यश मिळवतात. या राशीच्या जातकांमध्ये धन प्राप्तीची देखील तीव्र इच्छा असते. यांचे जीवन धन-धान्याने परिपूर्ण असतं.
 
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुख-साधन आणि धन- वैभवाचे प्रतीक मानले गेले आहे. या राशीवर शुक्राची कृपा झाल्याने जातकाला प्रत्येक सुख-सुविधा प्राप्त होते. या लोकांना आकर्षक वस्तूंची आवड असते. भाग्यही साथ देतं म्हणून या राशीच्या जातकांना पैशांची कमी नसते.
 
कर्क 
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राला जल म्हणजे शीतलतेचं कारक मानले आहे. या राशीचे लोक चंचल प्रवृत्तीचे असले तरी मेहनती देखील असतात आणि कोणतेही कार्य करण्यास नकार देत नाही. ज्यामुळे कमी वयात धन कमवण्यात यश मिळवतात. 
 
सिंह
सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते. सूर्याच्या प्रभावामुळे या जातकांमध्ये तेज असतो. या राशीच्या लोकांना उच्च दर्जेच्या वस्तू पसंत पडतात. चांगल्या वस्तूंची आवड असल्यामुळे हे धनप्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. याच कारणामुळे यांचे जीवन धन-धान्याने परिपूर्ण असतं.