पं. हेमन्त रिछारिया
प्रभू श्रीरामाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या लहान भाऊ भरतसाठी राज्याचा त्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका आणि गुरु वशिष्ठानी त्यांचा राज्याभिषेकाच्या स्तुतीला कारणीभूत ठरवतात. ते आपल्या आधार देणाऱ्या या वस्तुस्थितीची रामचरित मानसामध्ये या ओळीने समर्थन देतात -
'जोग, लगन, ग्रह, वार, तिथि, सकल भए अनुकूल।
चर अरु अचर हर्षजुत, राम जनम सुख मूल।'
या ओळींच्या आधारावर अनेकदा लोकं ज्योतिषाची टिंगल टवाळी करतात आणि म्हणतात की सगळं काही तर सुरळीत होत, सगळं अनुकूल असताना प्रभू श्रीरामाच्या जीवनात इतके दुःख का आले? खरं तर या प्रकाराचे युक्तिवाद पूर्णपणे अयोग्य आहे. कारण जर आपण या ओळी काळजीपूर्वक वाचाल तर आपणास समजेल की हे योग, लग्न ग्रह, वार यांचे अनुकूल होणं हे श्रीरामाच्या दृष्टिकोनातून नसावं. हे सर्व मूळ आणि सजीव आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितले जाते.
येथे दुसरी ओळ स्पष्टपणे दर्शवते की-
'चर अरु अचर हर्षजुत, राम जनम सुख मूल।'
म्हणजे सर्व मूळ आणि सजीव साठी योग, लग्न, ग्रह आणि वार अनुकूल आणि जागरूक होतात जेव्हा भगवान रामाचा जन्म म्हणजे प्रगट होणं कारण श्री रामाचा जन्म सर्व आनंदाचे मूळ आहे.
ज्योतिषाला संशयाखाली आणणारा दुसरा युक्तिवाद असा आहे की ज्यावेळी गुरु वशिष्ठानी प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाची वेळ काढली होती. तर त्यांना राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासात का जावं लागलं? खरं तर हे युक्तिवाद देखील अयोग्य आहे, कारण गुरु वशिष्ठांनी कधीही प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाची वेळ काढलीच नव्हती.
रामचरित मानसातील या ओळींना बघावं -
'यह विचार उर आनि नृप सुदिनु सुअवसरु पाइ।
प्रेम पुलकि तन मुदित मन गुरहि सुनायउ जाइ।।'
म्हणजेच राजा दशरथांनी आपल्या मनात प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाचे विचार आणल्यावर शुभ दिवस आणि शुभ वेळ बघून आपल्या विचारांची मांडणी गुरु वशिष्ठांकडे केली. इथे शुभ वेळ आणि शुभ दिवस हे भगवान रामाच्या राज्याभिषेकाशी निगडित नसून दशरथांची वशिष्ठजींना भेटण्याची वेळ आणि दिवस असे. तेव्हा गुरु वशिष्ठानी सांगितले -
'अब अभिलाषु एकु मन मोरें। पूजिहि नाथ अनुग्रह तोरें।
मुनि प्रसन्न लखि सहज सनेहू। कहेऊ नरेस रजायसु देहू।।'
म्हणजेच, राजाचे प्रेम बघून वशिष्ठानी त्यांना आदेश देण्यास सांगितले. येथे लक्षात घेण्यासारखे असे की गुरु अनिष्ट होण्याचे संकेत देऊ शकतात पण राजाच्या आज्ञांचे अवमान करू शकत नाही. येथे गुरु वशिष्ठ म्हणत आहेत -
'बेगि बिलम्बु करिअ नृप साजिअ सबुइ समाजु।
सुदिन सुमंगलु तबहिं जब राम होहिं जुबराजु।।'
म्हणजे शुभ दिन तेव्हाच असे ज्यावेळी राम राजा बनणार. येथे गुरु वशिष्ठानी असे काहीही म्हटले नाही की रामच राजा बनणार. पुढील एका संकेतात म्हटले आहेत -
'जौं पांचहि मत लागै नीका, करहु हरषि हियैं रामहि टीका।'
जर का पंचांना (आपण सर्वांना) हे मत आवडत असल्यास आपण रामाचे राज्याभिषेक करावं.
वरील तथ्यांवरून हे स्पष्ट होतं की गुरु वशिष्ठानी निव्वळ राजाज्ञा आणि लोकमताने प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाची संमती दिली असे, भगवानाची जन्मपत्रिका किंवा पंचांग बघून राज्याभिषेकाची वेळ काढली नव्हे. अशा प्रकारे रामचरितमानसाच्या या ओळींचा सखोल अर्थ न समजता आपण याला आधार बनवून ज्योतिषशास्त्राला दोष कसं देऊ शकतो? प्रभू श्रीरामाच्या वनवासाला ज्योतिषशास्त्राला कारणीभूत ठरवणं पूर्णपणे अयोग्य आणि चुकीचे आहेत.