शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (14:13 IST)

चंद्र ग्रह शांती, मंत्र व उपाय

वैदिक ज्योतिषात, चंद्र हा मन, माता आणि सौंदर्याचा कारक आहे. चंद्र ग्रहाच्या शांतीशी संबंधित अनेक उपाय आहेत. यामध्ये सोमवारचे व्रत, चंद्र यंत्र, चंद्र मंत्र, चंद्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान, खिरणीचे मूळ आणि दोन मुखी रुद्राक्ष धारण करणे यांचा समावेश आहे. कुंडलीतील चंद्राची शुभ स्थिती जीवनात सुख, आनंद, आईचे उत्तम आरोग्य आणि उत्तम जीवनसाथी घेऊन येते. त्याचबरोबर चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे मानसिक विकार, मनाची भटकंती, आईला त्रास इ. गोष्टीचा समावेश असतो. कुंडलीत चंद्र जर अशुभ ग्रहाने पीडित असेल तर चंद्र ग्रहाशी संबंधित कार्य अवश्य करावे. हे उपाय केल्याने चंद्राचे शुभ परिणाम प्राप्त होतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राशी संबंधित कपडे आणि उत्पादने परिधान करणे हे देखील चंद्र ग्रहाशी संबंधित महत्वाचे उपाय आहेत.
 
पोषाख व जीवन शैलीशी निगडित चंद्र ग्रह शांतीचे उपाय
चंद्र ग्रह शांतीसाठी उपाय
पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करा.
आई, सासू व वयस्कर महिलांचा सन्मान करा.
रात्री दुधाचे सेवन करा.
चांदीचे भांडी वापरा.
 
विशेषतः सकाळी केले जाणारे चंद्र ग्रहाचे उपाय
दुर्गा देवीची पूजा करा.
भगवान शिवाची आराधना करा.
भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
शिव चालिसा/दुर्गा चालिसा जप करा.
 
चंद्र ग्रहासाठी व्रत
शुभ चंद्र सुख, शांती, समृद्धी आणि दयेचा द्योतक आहे. चंद्र ग्रहाची कृपा दृष्टी प्राप्तीसाठी सोमवारी व्रत करा.
 
चंद्र ग्रह शांतीसाठी दान करा
चंद्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान सोमवारी चंद्राच्या होरा आणि चंद्राच्या नक्षत्रात (रोहिणी, हस्त, श्रवण) यात सकाळी करावे.
दान केल्या जाणार्‍या वस्तू- दूध, तांदूळ, चांदी, मोती, पांढरे कपडे, पांढरे फुलं आणि शंख इतर...
 
चंद्रासाठी रत्न
ज्योतिष शास्त्रात चंद्र ग्रहासाठी मोती रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जर जातकाची रास कर्क असेल तर त्याने मोती धारण करावा. याने जातकाला चंद्राचे उत्तम फळ प्राप्त होतात.
 
श्री चंद्र यंत्र
चंद्र ग्रह शांतीसाठी चंद्र यंत्र सोमवारी चंद्राच्या होरा आणि चंद्र नक्षत्रावेळी धारण करावं.
चंद्रासाठी जडी
खिरणीचं मूळ धारण केल्याने चंद्र ग्रहाचे शुभ परिणाम प्राप्त करता येतात. हे मूळ सोमवारी चंद्राच्या होरा व चंद्र नक्षत्रात धारण करावं.
 
चंद्रासाठी रुद्राक्ष
चंद्रासाठी 2 मुखी रुद्राक्ष धारण करणे योग्य ठरतं.
दोन मुखी रुद्राक्ष धारण करण्यासाठी मंत्र:
ॐ नमः।
ॐ श्रीं ह्रीं क्षौं व्रीं।।
 
चंद्र मंत्र
चंद्र देवाची कृपा दृष्टी प्राप्तीसाठी चंद्र बीज मंत्र जपावं. 
मंत्र - ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः!
11000 वेळा चंद्र मंत्राचं उच्चारण करावं. तथापि देश-काळ-पात्र सिद्धांतानुसार कलयुगात हे मंत्र (11000X4) 44000 वेळा जपण्याचा सल्ला दिला गेला आहे.
 
आपण हे मंत्र देखील जपू शकता- ॐ सों सोमाय नमः!
या लेखात दिलेले चंद्र ग्रह शांतीचे उपाय वैदिक ज्योतिषावर आधारित आहेत, जे खूप प्रभावी आणि सोपे आहेत. जर तुम्ही चंद्र बलवान करण्याची पद्धत योग्यरीत्या केलीत तर तुम्हाला मानसिक शांती मिळेल. चंद्रग्रह शांती मंत्र मनात सकारात्मक विचारांना जन्म देतो, ज्यामुळे व्यक्ती योग्य दिशेने विचार करते आणि पुढे जाते. चंद्रदोषाच्या उपायाने व्यक्तीला मातेचे सुख प्राप्त होते. जेव्हा चंद्र बलवान असतो तेव्हा आईला आरोग्य लाभ होतो.
 
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीचे लोक चंद्र ग्रहाचे उपाय करू शकतात. कुंडलीत ग्रह कमजोर असेल तेव्हाच ग्रहशांतीसाठी उपाय करावेत. परंतु जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत असेल तर त्याचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी तुम्ही चंद्र ग्रहाच्या शांतीसाठी उपाय देखील करू शकता. या लेखात चंद्र ग्रहाचे उपाय जसे की चंद्र ग्रहाच्या मंत्राचा जप, चंद्र ग्रहासाठी दान, चंद्र व्रत करण्याची पद्धत इत्यादी देखील अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.