शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (23:22 IST)

लाल किताब अनुसार गुळाचे सेवन का करावे ?

भारतीय परंपरेत ऊस आणि गूळ खूप लोकप्रिय आहेत. आरोग्यासोबतच याचा उपयोग ज्योतिषीय उपायांमध्येही केला जातो . गूळ आणि तूप मिसळून त्याचा उदबत्ती कंड्यांवर लावल्याने घरातील समस्या आणि ग्रह दोष दूर होतात. चला जाणून घेऊया लाल किताबात गूळ खावा असे का म्हटले आहे.
1. लाल किताबानुसार, गूळ आणि गहू या सूर्य ग्रहाच्या कारक गोष्टी आहेत .
 
2. पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर गूळ खाऊन पाणी पिऊन कोणतेही काम सुरू करावे.
 
3. वाहत्या पाण्यात गूळ टाकल्याने सूर्याचे दोषही दूर होतात.
 
4. रविवारपासून 8 दिवस मंदिरात 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ अर्पण करा.
 
5. बाराव्या घरात सूर्य असेल तर माकडांना गूळ खाऊ घाला.
 
6. देशी गूळ घरात ठेवा आणि वेळोवेळी थोडा-थोडा खात राहिल्यास सूर्य प्रबळ होईल.
 
७  जर कोणत्याही प्रकारची भीती असेल तर तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवा आणि हनुमानजीच्या मंदिरात दान करा आणि तिथे बसून उदबत्ती लावून हनुमान चालीसा पाठ करा. मंगळवार आणि शनिवारी असे करा.
 
8. हनुमानजींना गूळ आणि हरभरा यांचा प्रसाद अर्पण केल्याने त्यांची कृपा कायम राहते.
 
9. जेवणात गुळाचा वापर केल्याने आरोग्यास लाभ होतो आणि गूळ थोडे थोडे खाल्ल्याने धनाची आवकही वाढते. 
 
10. मंगळवारी 1.25 किलो गूळ जमिनीत दाबल्याने भाऊ-बहिणीत समझोता होतो.