शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:45 IST)

वारंवार सांगतो, तुटेपर्यंत ताणू नका : अनिल परब

“एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार सांगतो, तुटेपर्यंत ताणू नका, कोणी आपल्याला भडकवत असेल तर त्यांच्या भडकवण्याला आपण बळी पडू नका, कारण नुकसान भडकवणाऱ्याचे होत नाही, नुकसान एसटीचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे होत आहे. असं आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. 
“हायकोर्टाने आम्हाला १२ आठवड्यांच्या आत निर्णय घ्या असे सांगितले होते, त्यामुळे आम्ही हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करु शकत नाही. मात्र जी टीका होत होती एसटीवर राज्य सरकार काहीच करत नाही, राज्य सरकार काहीचं करत नाही, राज्य सरकार संप चिघळवतेय म्हणून आम्ही दोन पाऊलं पुढे आलो आणि कामगारांसमोर हा पर्याय ठेवला. काही कामगारांनी हा निर्णय मान्य केला,मात्र काही कामगार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून आहेत. परंतु विलिनीकरणाचा मुद्दावर हायकोर्टाने नेमलेल्या समितीसमोरचं निर्णय होईल, त्यामुळे १२ आठवडे संप लांबवता येणार नाही. संप मिटवून विलिनीकरणाच्या मुद्दावर जेव्हा समितीचा अहवाल येईल तेव्हा पुन्हा एकदा चर्चा करु. असं आश्वासन अनिल परब यांनी दिले आहे.