बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:43 IST)

जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा,एसटी संप कर्मचारी उपाशी आणि नेते तुपाशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ७०,००० एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ३५० रुपये घेतल्याचा आरोप केलाय. तसेच यातून कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली असून एसटी संप कर्मचारी उपाशी आणि नेते तुपाशी असं म्हणत निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३५० रुपये घेण्यात आले. एकूण ७०,००० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची लूट करण्यात आली. ST संप कर्मचारी उपाशी, नेते तुपाशी.”