मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार, नारायण राणे यांचे विधान
पुन्हा एकदा भाजपने महाराष्ट्रात आपले सरकार येणार आहे, असा दावा केला आहे. आतापर्यंत भाजपकडून तीनवेळा हा दावा करण्यात आला होता. मात्र, तसे काही घडलेले नाही. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं विधान केले आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार आहे, असे मोठे विधान केले आहे. मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार असल्याचे राणेंनी म्हटले आहे. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल, असे राणे म्हणाले.