बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (10:53 IST)

आमदाराने ट्रकचालक बनून पोलिसांच्या वसूलीचे स्टिंग ऑपरेशन केले

प्रतीकात्मक चित्र :चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. य व्हिडिओमध्ये पोलीस वाहनचालकांकडून बळजबरी आर्थिक लूट करत होते. या व्हिडिओ मधील घडलेल्या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी चाळीसगावात आमदार मंगेश चव्हाण यांनी चक्क ट्रॅक चालकाचा वेष घेऊन आर्थिक दृष्टया वाहन चालकांना लुबाडत असणाऱ्या या पोलिसांचे स्टिंग ऑपेरेशन केले. त्यांनी स्वतः ट्रकचालक बनून ट्रक चालवत नेले. अवजड वाहनांना प्रवेश नसून देखील हे पोलीस अवजड वाहन चालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडायचे. हे समाजतातच आमदारांनी स्वतः ट्रक चालवत वाहन कन्नड घाटाच्या दिशेने नेले. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली. आमदारांनी थोडे कमी पैसे घ्या असं म्हणत पोलिसांच्या हातात 500 रुपये ठेवले आणि उर्वरित पैसे परत द्या असे म्हटले . पोलसांनी ते देण्यास नकार दिला. नंतर आमदारांनी बाजूला उभे असलेल्या एका  पोलिसाला  सांगून मला पैसे परत द्या अशी विनवणी केली. तर त्या पोलिसांनी शिवीगाळ करायला सुरु केले. आमदार ट्रक मधून खाली उतरले आणि पोलिसांना जाब विचारले. काही पोलिसांना ते खुद्द आमदार असल्याचे समजतातच त्यांनी तिथून पळ काढला. आमदारांच्या या स्टिंग ऑपरेशनामुळे पोलिसांची आर्थिक लूट उघडकीस आली.