बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:44 IST)

हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनलं आहे : संजय राऊत

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. विरोधकांनी कितीही भ्रम निर्माण केला तरी सरकार उत्तम चाललय, हे सरकार प्रदीर्घ काळासाठी बनलं आहे, असे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिलं आहे. महाविकास आघाडीला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयावर भाष्य केले.
यावेळी  चंद्रकांत पाटील यांनी सरकारला गुढीपाडव्यापर्यंत मुदत दिली. लहानपणी आम्ही ऐकायचो ‘गुढी पाडवा, नीट बोल गाढवा’, असे हे बोलत आहेत. त्यांनी असे करु नये. तुम्ही सरकार पाडायची वेळी निघून गेली. तुम्हाला वाटलं सरकार पंधरा दिवसात पडेल, दहा दिवसात पडेल, असे सरकार पाडता येत नाही. हे त्यांना (चंद्रकांत पाटील) समजले पाहिजे. केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करुन सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फरक आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही, त्यामुळे सरकार टिकणार”, असे राऊत म्हणाले. 
संजय राऊत म्हणाले, “मधल्या काळात सगळे विरोधीपक्ष दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काही जमले होते. तेव्हा या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते बोलत होते, त्यांनी कसं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत मोठा विजय मिळवला. तेव्हा मी उठून उभा राहिलो. त्यांना सांगितल तुमच्या आधी खेला होबे महाराष्ट्रात केल. तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येवून भाजपाला दूर येऊन. थेट  निवडून येऊन सत्ता स्थापन करणे सोपं असते. मात्र भूमिका वेगळ्या असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करायच आणि बलाढ्य, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला दूर ठेवायचं हे खऱ्या अर्थाने खेला होबे झालं.”