सोमवार, 29 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:23 IST)

हायकोर्टाचा नवाब मलिक यांना दणका

High Court slams Nawab  हायकोर्टाचा  नवाब मलिक यांना दणका  Maharashtra News Regional Marathi In Webdunia Marathi
राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे  आणि त्यांच्या कुंटुबियांवर आरोपांची मालिक सुरु केली होती. पण आता हायकोर्टानेच  नवाब मलिक यांना दणका दिला आहे.
आगामी सुनावणीपर्यंत नवाब मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाही अशी हमी नवाब मलिकांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.  नवाब मलिक- ज्ञानदेव वानखेडे प्रकरणाची सुनावणी द्विसदस्यीय खडपीठासमोर झाली. याची पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत वानखेडे कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतंही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्य केलं जाऊ नये असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. 
नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जात प्रमाणपत्रावरुन संशय व्यक्त करत आरोप केला होता. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वकिल ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केला होता. आपल्या कुटुंबाविरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यावर बंदी घालावी अशी दाद त्यांनी कोर्टात मागितली होती