रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (08:20 IST)

राज्यात ११ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले, टोपे यांची माहिती

राज्याने गुरुवारी  करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. राज्यात ११ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
“महाराष्ट्रात ११ कोटी नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा टप्पा गाठण्यात \यश आले. या यशाबद्दल महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आणि लसीकरणाच्या कामात व्यस्त असणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.” अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहीमेतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
तसेच, “राज्यात ९ नोव्हेंबर रोजी १० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. तेंव्हापासून राज्यात एक कोटींवर नागरिकांना लस देण्याचे काम झाले आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो.” असं देखील टोपे म्हणाले.
याचबरोबर, “राज्यातील ३.७६ कोटी नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्या आहेत. ७.२४ कोटी नागरिकांना एक मात्रा देण्यात आली आहे. लवकरच राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विभागाला दिले होते. राज्यात नवरात्रोत्सवात ‘कवचकुंडले’ अभियान राबविण्यात आले. काही महापालिकांनी घरोघरी जाऊन लसीकरणास सुरुवात केली..