बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (11:49 IST)

नाशिक हादरलं ! नाशिकात भाजपच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

नाशिकात भाजपच्या पदाधिकारी अमोल इघे यांची निर्घृण हत्या करण्यात आली . अमोल हे सातपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले आहे. सध्या नाशिकात पदाधिकाऱ्यांची हत्येचे सत्र सुरूच आहे या पूर्वी आरपीआय च्या एका महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची देखील निर्घृण हत्या केली होती.   
या घटनेमुळे नाशिकात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हे खून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.