शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (09:25 IST)

कितीही चौकशा लावा, घाबरत नाही - शरद पवार

ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार केंद्र सरकार करत असते. सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम ते नेहमी करतात; पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू देत. त्यामुळे अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, "सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि सर्वजण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल.
"सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यांत, नंतर एक वर्षात पडणार, असं भविष्य अनेक जण वर्तवित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही अधूनमधून भविष्य वर्तवित असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल," असा टोला पवार यांनी हाणला आहे.