बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (09:15 IST)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल - राऊत

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
2024च्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण वाटत नाही. काँग्रेससह महाविकास आघाडी होईल, यातही मला काही अडचण येईल, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.
"चंद्रकांत पाटील यांना समजले पाहिजे की, केंद्रीय बळाचा, सत्तेचा वापर करुन सरकार पाडण्याची वेळ निघून गेली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फरक आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षात कोणीही ज्योतिरादित्य शिंदे नाही, त्यामुळे सरकार टिकणार", असंही राऊत म्हणाले.