मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (14:00 IST)

राज्यातील प्राथमिक शाळा सुरु होणार 'या' असणार गाईडलाईन

कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून  ऑनलाईन शिक्षण सुरु होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यसरकारने टास्क फोर्सशी चर्चा करून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु आहे. प्राथमिक शाळांबाबत कोणतेही निर्णय घेतले जात नव्हते. परंतु आता प्राथमिक वर्ग इयत्ता पहिली ते चवथीचे वर्ग आता येत्या 1 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. प्राथमिक शाळेची घंटा वाजणार. या बाबत काही मार्गदर्शक तत्वे म्हणजे गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या सदस्यांनी  सांगितले की येत्या गुरुवार पासून शाळा सुरु होणार. त्यासाठी बालक, पालक आणि शिक्षकांनी काही गाईड लाईन्स पाळाव्यात. जसे की मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, स्वच्छता पाळणे, सेनेटाईझ करणे, हाताला वारंवार धुणे, शाळेत गर्दी न करणे. पालकांना मुलांना शाळेत पाठविण्याची कोणतीही सक्ती नसेल. आजारी मुलांना शाळेत पाठवू नयेत. तसेच कॅव्हिडच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे बंधनकारक आहे.