शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:40 IST)

राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड

कोल्हापूर विधान परिषदेच्या  जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक  यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळतेय.