गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:14 IST)

अबस्कॉन्डरची ऑर्डर रद्द करण्यासंदर्भात परमबीर सिंह यांचा अर्ज दाखल

मुंबईतील एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून खंडणी प्रकरणात अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आलेल्या परमबीर  सिंह यांच्याकडून किला कोर्टात अर्ज करण्यात आला. प्रोक्लेमेशन अबस्कॉन्डरची ऑर्डर रद्द करण्यासंदर्भात हा अर्ज करण्यात आला आहे. याआधी किला कोर्टाने फरार घोषित करण्याची जी नोटीस जारी केली होती ती रद्द व्हावी म्हणून सिंग यांचा अर्ज करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त फरार म्हणून घोषित केल्यानंतर जवळपास २३१ दिवसांनी मुंबई क्राईम ब्रॅंचच्या चौकशीला मुंबईत हजर झाले. क्राईम ब्रॅंचकडून तब्बल ६ तास परमबीर सिंह यांची चौकशी करण्यात आली. किला कोर्टात केलेल्या अर्जानुसार याचिकेवर सोमवारी सुनावणी होईल असे अपेक्षित आहे.
परमबीर सिंह यांनी एपीआय सचिन वाझे यांच्या माध्यमातून खंडणी वसुली केली अशी तक्रार गोरेगावातील एका व्यावसायिकाने केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचने परमबीर सिंह यांच्या नावे समन्स बजावला होता. पण अनेक समन्सला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर किला कोर्टाकडून परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले. दरम्यानच्या काळात परमबीर सिंह यांच्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी याचिका केली होती. त्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानेही परमबीर सिंह कुठे आहेत ? त्यांचे सध्याचे वास्तव्याचे ठिकाणी कळाल्याशिवाय सुनावणी घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. त्यावर परमबीर सिंह यांच्या वकिलांनी परमबीर सिंह हे भारतात असून ४८ तासात न्यायालयात हजर होतील असे सांगण्यात आले होते. परबीर सिंह यांना मुंबई पोलिसांकडून धोका असल्याचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. पण अचानकपणे मंगळवारी परमबीर सिंह यांचा मोबाईल अचानकपणे सुरू झाला.