रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (09:07 IST)

खाण्यापिण्यातून ग्रह करा प्रसन्न

ग्रहांचा आणि खाण्यापिण्याचा जवळचा संबंध आहे. तुमच्या ग्रहांची स्थिती काय आहे, यावरही तुमचे खाणे अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. तुमची बिघडलेली ग्रहस्थिती ताळ्यावर आणण्यासाठी काही प्रमाणात खाणेही परिणामकारक ठरू शकते. त्याचवेळी तुमच्यावर नाराज असलेल्या ग्रहाच्या कोपापासून वाचण्यासाठी खाण्यापिण्यातही काळजी घ्या. त्यासाठी खाली दिलेले सल्ले नक्कीच उपयोगी पडतील. 
 
१. मंगळ वक्री असेल तर मग मसालेदार पदार्थ टाळा. संत्रे, चिकू जास्त खा. पाणी जास्त प्या. लठ्ठपणा वाढविणारे पदार्थ व फास्ट फूडपासून दूर रहा. 
 
२. शुक्राची वक्रद्रृष्टी तुमच्यावर असेल तर मग ती दूर करण्यासाठी पांढर्‍या रंगाचे पदार्थ खा. साबूदाणा वगैरे. चीज, पनीर, दही यांचा समावेश रोजच्या जेवणात करा. सफेद बर्फी खा. इतरांना खाऊ घाला. 
 
३. बुधाचे तुमच्याशी वाकडे असेल तर सलाड भरपूर खा. मुगाची डाळही आहारात घ्या. खिचडी हा तर चांगला पर्याय आहे. हिरव्या भाज्यांचे सूप फायदेशीर ठरू शकते. 
 
४. सूर्याचा ताप होत असेल तर फळे जास्तीत जास्त खा. बाहेर खाणे टाळा. आठवड्यात एकदा तरी उपास पाळा. मांसाहार टाळा. नेहमीचेच जेवण जेवा. रविवारी मीठ खाऊ नका. 
 
५. गुरू अनुकूल नसल्यास हळदीच्या दुधाचे सेवन करा. केळे खा. पिवळी बर्फी, फळ खा. आपल्या शिक्षकांनाही ते द्या. आठवड्यातून एकदा चण्याची डाळ खा. लठ्ठपणा वाढविणारे पदार्थ खाऊ नका. 
 
६. चंद्र कमजोर असेल तर दूध व त्यापासून बनलेले पदार्थ जास्त खा. पाणी भरपूर प्या. मसालेदार पदार्थ कमी खा. तांदळाची खीर सोमवारी खा. 
 
७. शनी त्रास देत असेल तर मांसाहार घेऊ नका. नशा करू नका. राजमा, उडीद, सरसोचे तेल वापरू नका. त्याऐवजी ते दान करा. 
 
हे उपाय अगदी साधे आहेत. पण करून तर बघा. किती सकारात्मक परिणाम होतो ते अनुभवा.