फसवणारी वधू-वर सूचक मंडळे

Last Modified सोमवार, 11 जानेवारी 2021 (16:24 IST)
वधू-वर सूचक केंद्र किंवा मंडळे आता बिनभांडवली धंदा झाला आहे. वधू-वर सूचक मंडळे प्रत्येक शहरात, गावात वाढलेली आहेत. अशी मंडळे उघडायला फार मेहनत करावी लागत नाही. अनेक वधू-वर सूचक मंडळे वृत्तपत्रात जाहिराती देतात. त्यांचे फोन नंबर खूप असतात. पण त्यातील काही नंबरच अस्तित्वात असतात. अशी अनेक वधू-वर सूचक केंद्रे लाखो
लोकांना सहज फसवितात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली येथील वधू-वर सूचक मंडळे महाराष्ट्रातील नामवंत वृत्तपत्रात जाहिराती मोबाइल नंबरसह देतात. मात्र पत्ता ते कुठेच देत नाहीत. क्वचितच आपले पत्ते देतात.

अनेक वधू-वर सूचक मंडळे आज फसवणूक, धोका, आर्थिक पिळवणूक करणार्यांशची मोठी केंद्रे बनली आहेत. या मंडळावर सरकारचा, पोलीस खात्याचाही अंकुश नाही. व्यापारी आयकर
भरण्याचा तर प्रश्नच नाही. बर्या,च वधू-वर मंडळांचे चालक हे आपले गुन्हे लपविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, पुढारी झालेले दिसतात. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील मॅरेज ब्यूरोंनीकाही गुंडही पाळलेले वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. ही वधू-वर सूचक मंडळे मोठी फी आकारून पालकांचे खिसे रिकामे करतात. भोळेभाबडे पालक आपल्या मुला- मुलींना चांगले स्थळ मिळेल, या आशेवर जगत असतात. पण या चालकांना पैसाच सगळ्या ठिकाणी दिसतो. पुण्यात 140 च्यावर, मुंबईत 200, कोल्हापूर 100, सोलापूर 50 च्या वर वधू-वर सूचक मंडळे आहेत. घर हेच त्यांचे ऑफिस झालेले आहे. काही तरुण नोकरी व्यवसाय नसल्याने यात शिरून ते आता श्रीमंत होत आहेत. काही सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिकही या क्षेत्रात पैसा कमवत आहेत. दुर्दैवाने जी फी आकारली जाते त्यासाठी त्यातील अनेक मंडळे पावती देतच नाहीत. शिवाय मुला- मुलींचे लग्न ठरल्यानंतर देणगी घेतात. हा ब्लॅक मनी असतो. त्याचीही हे बिलंदर पावती देत नाहीत. उलट तगादा लावून गैरमार्ग वापरून पैसे वसूल करतात.
आज महाराष्ट्रात 10 लाखांच्या वर छोटी-मोठी वधू-वर सूचक मंडळे विविध जाती-उपजातींची आहेत. काही जोडधंदा म्हणून या धंद्याकडे पाहतात आणि पैसे कमवितात. काही वधू-वर सूचक मंडळे एकाच मुलीचा किंवा मुलाचा फोटो अनेकांना दाखवून त्या पालकांकडून पैसे लुटतात. काही वधू-वर सूचक मंडळे काही मुला-मुलींना राखीव ठेवतात. त्यांना काही पैसे देतात. नंतर ही देखणी मुलगी त्या वधूवर सूचक मंडळाकडून पैसे घेते. मग वधू-वर सूचक मंडळे काहीतरी कारण दाखवून पालकांना फसवतात. मीटिंगचे पैसे मात्र खूप घेतात. पोलिसांनाही याचा पत्ता नसतो. अनेक पालक पोलिसांकडे तक्रार करीत नाहीत. वधू-वर सूचक मंडळे मुला-मुलींची खोटी माहिती पालकांना देतात. काही चांगल्या संस्था या क्षेत्रात टिकून आहेत. अनेक वधू-वर सूचक मंडळांचे चालक या केंद्रासाठी जागा काही भाड्याने घेऊन आपण पत्रकार, पदाधिकारी आहोत, सामाजिक कार्य केवळ तुमच्यासाठी करतो, असे गोड बोलून लोकांना फसवितात. वधू-वर सूचक मंडळांचे मेळावे हादेखील फार्स आहे. पुन्हा हे चालक पालकांकडून पैसे उकळतात. एकूण पालकांचा खिसा रिकामा कसा होईल, यासाठी हे चालक, व्यवस्थापक अनेक खेळी करतात. काही व्यक्तिगत स्वरूपात असे कार्य करतात. मुलगा-मुलगी दाखवण्यासाठी पालकांकडून जाणे-येणे, रेल्वे-एसटीचे भाडे, शिवाय लॉज खर्च, अन्य खर्च उकळतात. अशी वधू-वर सूचक मंडळे बीड, कर्नाटकात खूप आहेत.कर्नाटकमधील काही वधू-वर सूचक मंडळे मुलीला एक आठवडा फसवणारी वधू-वर सूचक मंडळे मुलाकडे नांदविण्यासाठी पाठवतात. मग हीच मुलगी काहीतरी खोटी कारणे दाखवून कोणालाही न सांगता पैसे, दागिने घेऊन पळून जाते. अशावेळी हीच वधू-वर सूचक मंडळे हात वर करून आपण अलिप्त असल्याचे दाखवितात. म्हणून या वधू-वर सूचक मंडळांपासून पालकांनी सावध राहाणे आवश्क आहे. आता फेसबुक, व्हॉट्‌सअॅपवर या बाबतीत अनेकांची फसवणूक होत आहे. यासाठी जागरूकता महत्त्वाची आहे. आता नोकरी नसल्याने तरुण-तरुणीही या क्षेत्रात येऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेत आहेत. शासनाने अशी वधू-वर मंडळे रद्द करण्याचे आदेश काढले पाहिजेत. शासकीय नोंदणी ज्यांनी केली आहे त्यांनाच हा व्यवसाय करण्यारसाठी परवानगी दिली पाहिजे.

सर्व वधू-वर सूचक केंद्रांवर अंकुश ठेवयला पाहिजे. फी किती घ्यायची, याची मार्गदर्शक तत्त्वे नियमावली झाली पाहिजे. सर्व व्यवहाराची रोख, चेकने पावती पालकांना दिली पाहिजे. शासनाने नोंदणीकृत वधू-वर सूचक मंडळांची नावे वृत्तपत्रांतून जाहीर केली पाहिजेत. आता अनेक वधू-वर सूचक मंडळे ऑनलाइनवरून आपल्या बँक खात्यात पैसेपाठविण्यास सांगत आहेत. याठिकाणी तर हमखास फसवणूक केली जाते.

फसवणूक केल्यावर हे लोक फोन बंद करतात. पुन्हा नवीन मोबाइल नंबर घेतात. पुन्हा अनेकांची फसवणूक करतात. म्हणून ग्राहकांनी त्यांच्या खात्यात पैसे पाठवू नयेत.
जगदीशचंद्र कुलकर्णीयावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

15 डिसेंबरपासून मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यावर

15 डिसेंबरपासून मुंबई, पुण्यात शाळा सुरू करण्यावर पुनर्विचार
राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर ...

भिंवडीत Selfie बेतली जीवावर

भिंवडीत Selfie बेतली जीवावर
सेल्फीच्या नादात भिवंडीत एका 13 वर्षीय मुलाने आपला जीव गमावला आहे. इमारतीवरुन पडून त्याचा ...

बुलढाणा: वाघामुळे शाळा-महाविद्यालये बंद

बुलढाणा: वाघामुळे शाळा-महाविद्यालये बंद
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीमध्ये वाघ शिरला होता. वस्तीत वाघ शिरल्याने भीतीचे ...

Credit Card Bill: बिलिंग सायकल काय आहे, देय तारीख आणि ...

Credit Card Bill: बिलिंग सायकल काय आहे, देय तारीख आणि मिनिमम पेमेंट, ते कसे मोजले जाते
भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढत आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ते अधिक महत्त्वाचे ...

सशस्त्र सेना ध्वज दिन

सशस्त्र सेना ध्वज दिन
1949 पासून देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी देशाच्या सीमेवर शत्रूंशी धैर्याने मुकाबला ...