मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (12:37 IST)

Mangal Gochar 2024 : 5 फेब्रुवारी रोजी मंगळ राशी परिवर्तन, या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात

पंचांगानुसार 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंगळ मकर राशीत असेल आणि 15 मार्च 2024 पर्यंत या राशीत राहील. ज्याचा प्रभाव मेष ते मीन राशीपर्यंतच्या 12 राशींवरही पडेल. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जा, सामर्थ्य, धैर्य, शौर्य, जमीन आणि शौर्याचा कारक मानला जातो. मंगळ राशी परिवर्तनने काही राशींना शुभ फल प्राप्त होतील तर काहींना जरा खबरदारी घ्यावी लागेल. तर जाणून घेऊया कोणाला समस्यांना सामोरा जावं लागू शकतो-
 
मिथुन- धन संबंधी निर्णय हुशारीने घ्या. व्यवसायात धन हानीचे संकेत आहे. कोणावरही डोळे बंध करुन विश्वास ठेवू नका. करिअरमध्ये नवीन आव्हांना सामोरा जाण्यासाठी तयार रहा. कामाचा ताण वाढेल. कायद्यांप्रकरणी काम चिघळू शकतात.
 
कर्क- दांपत्य जीवनात समस्या वाढू शकतात. नात्यांना ताण वाढेल. साथीदारासोबत वाद टाळा. जीवनसाथीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. आरोग्यासंबंधी लहान-सहान समस्यांमुळे त्रास्त जाणवेल.
 
सिंह- लांबचा प्रवास करणे टाळा. अधिक खर्च झाल्याने काळजी वाटेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढू शकतात. ताप-सर्दी-खोकला या सारख्या हंगामी आजारामुळे समस्या होऊ शकतात.
 
कन्या- भावनिक चढ-उतार शक्य आहे. साथीदारासोबत वाद घालणे टाळा. प्रोफेशनल जीवनात येत असलेल्या आव्हानांना ठोसपणे सामोरा जाण्याचा प्रयत्न करा. सहकर्मचार्‍यांसोबत वाद - ताण निर्माण होऊ शकतो. बॉसच्या गोष्टींकडे प्रमाणिकपणे लक्ष द्या. आर्थिक प्रकरणांमध्ये रिस्क घेणे टाळा.