शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

विवाहाचा आपल्या नात्यावर काय प्रभाव पडतो जाणून घ्या...

आपले विवाह कोणत्या महिन्यात झाले आहे याचा आपल्या नात्यावर प्रभाव पडत असतो.. तर चला जाणून घ्या...आपल्या नात्याबद्दल:
 
22 डिसेंबर ते 19 जानेवारी: या दरम्यान संपन्न झालेल्या विवाहावर मकर राशीचा प्रभाव असतो अर्थात असे जोडपे खूप जबाबदार असतात परंतू त्यांच्यात रोमांसची कमी असते.
 
20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी: या दरम्यान झालेले विवाह कुंभ राशीने प्रभावित असतात. अर्थात असे जोडपे जगावेगळे असतात. हे सकारात्मक विचारधारा असलेले आणि नेहमी आकर्षणाचे केंद्र असतात.
 
19 फेब्रुवारी ते 20 मार्च: या दरम्यान झालेले विवाह मीन राशीने प्रभावित असतात. हे जोडपे इमोशनल असतात. एकमेकांवर खूप प्रेम करतात परंतू दर्शवत नाही.
 
21 मार्च ते 19 एप्रिल: हे विवाह मेष राशीने प्रभावित असतं, असे जोडपे रोमँटिक आणि स्वभावाने स्पष्ट असतात. दोघांमध्ये प्रेमही असतं आणि मतभेददेखील कारण दोघेही स्वत:ची तुलना करत असतात.
 
20 एप्रिल ते 20 मे: हे विवाह वृषभ राशीने प्रभावित असतं, या जोडप्यातून एक प्रभुत्व गाजवणारा तर दुसरा जुळवून घेणारा असतो म्हणून हे नातं सुरळीत असतं.
  
21 मे ते 20 जून: मिथुन राशीने प्रभावित या विवाहात प्रत्येक गोष्टीची अती असते, मग ते प्रेम असो वा भांडण. असे जोडपे प्रेम करताना अगदी आकंठ प्रेमात बुडतात आणि भांडतात तेव्हा कितीतरी‍ दिवस एकमेकाचं तोंडदेखील बघायला तयार नसतात.
 
21 जून ते 22 जुलै: हे विवाह कर्क राशीने प्रभावित असतं. ज्यात पती-पत्नी घरामुळे परेशान असतात आणि आविष्यभर त्याचा वि‍चार करत असतात. दोघं कधी तर प्रेमात बुडून जातात परंतू कामाची जबाबदारी लक्षात येताच यांच्यातील रोमांस हरवून जातो.
 
23 जुलै ते 22 ऑगस्ट: हे विवाह सिंह राशीने प्रभावित असतात, या जोडप्यात अहंकार असतो ज्यामुळे भांडण होतात. यांच्यात प्रेम आणि काळजी असते परंतू राग आल्यावर सर्वकाही नाहीसं होतं.
 
23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर: हे विवाह कन्या राशीने प्रभावित असतात और असे जोडपे खूप संवेदनशील आविष्य जगतात.
 
23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर: या तारखांमध्ये झालेले विवाह तूळ राशीने प्रभावित असतात. या जोडप्यात प्रत्येक गोष्ट खूप संतुलित असते. म्हणून यांना पर्फेक्ट कपल म्हणतात.
 
23 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर: या दरम्यान झालेले विवाह वृश्चिक राशीने प्रभावित असतात. असे जोडपे प्रेमी असतात ज्यामुळे यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. पण याची पूर्ती न झाल्यास वाद निर्माण होतात.
 
22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर: हे विवाह धनू राशीने प्रभावित असतात. हे जोडपे हट्टी असतात तरी एकमेकाला समजून घेतात आणि आपल्या नात्याची काळजी घेतात.