रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 22 जून 2022 (13:15 IST)

27 जून ते 10 ऑगस्टपर्यंत राहू आणि मंगळ मेष राशीत, 7 राशींसाठी शुभ, 5 राशी संकटात

rahukal
27 जून ते 10 ऑगस्ट 2022 या काळात मेष राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग होईल. राहू आणि मंगळाच्या संयोगाने अंगारक योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात अंगारक हा योगामध्ये अशुभ मानला जातो. या संयोगामुळे 7 राशींना फायदा होईल आणि 5 राशींसाठी हा योग अशुभ मानला जातो. यापैकी तुमची राशी कोणती आहे ते जाणून घेऊ या.
 
7 राशींना फायदा होईल
मेष: आदर वाढेल, धैर्य आणि पराक्रम वाढेल. नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक परिणाम होतील.

मिथुन : तुमची कीर्ती वाढेल. नोकरीत पदोन्नती होईल. व्यवसायात लाभ होईल.
 
कर्क : नोकरीत यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक कार्यात रस घ्याल.
 
सिंह : प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक प्रवासाचे योग आहेत.
 
तूळ : व्यापारी असाल तर मोठा फायदा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर पगार वाढण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक : रोग आणि शत्रूंवर विजय मिळेल. नोकरीत लाभ होईल.
 
धनु : अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही इमारत, वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता.
 
5 राशींसाठी अशुभ
वृषभ : नोकरीत सावध राहा. व्यावसायिक निर्णय हुशारीने घ्या. देण-घेण टाळा आणि शत्रूंपासून सावध रहा.
 
कन्या : अवाजवी खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक वादांपासून दूर राहा.
 
मकर : आरोग्याची काळजी घ्या. नोकरी आणि व्यवसायात संमिश्र प्रभाव राहील.
 
कुंभ : नोकरीत असाल तर सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. स्थलांतराची शक्यताही वर्तवली जात आहे. व्यवसायात नुकसान होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.
 
मीन: अवाजवी खर्च वाढतील. तुमच्या वागण्याने किंवा कामामुळे तुम्हाला घरात बसून त्रास होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.