मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (08:08 IST)

मंगळामुळे या लोकांना घर आणि जमिनीचे सुख प्राप्त होते

सिंह लग्न कुंडलीच्या एकादश आणि द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...
 
सिंह लग्न कुंडलीच्या एकादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
जर एखाद्या व्यक्तीची सिंह लग्न कुंडली असेल आणि कुंडलीतील अकराव्या स्थानात मंगळ स्थित असेल तर त्या व्यक्तीला जमीन आणि घराचे सुख प्राप्त होते. सिंह लग्न कुंडलीतील अकरावे स्थान मिथुन राशीचे असून स्वामी बुध आहे. हे स्थान लाभ कारक स्थान आहे. या स्थानात मंगळ असल्यास व्यक्तीला आर्थिक कामामध्ये चांगल्या प्रक्रारे लाभ होतो. यांना आईचे पूर्ण सुख मिळते. हे लोक शत्रूंवर विजय प्राप्त करतात. कधीकधी काही आजार त्रास देतात, परंतु यामधून यांना लवकर आराम मिळतो.
 
सिंह लग्न कुंडलीत द्वादश स्थानात मंगळ असेल तर...
सिंह लग्न कुंडलीतील बाराव्या स्थानात मंगळ असेल तर व्यक्तीला पैसा कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. सिंह लग्न कुंडलीत द्वादश स्थान कर्क राशीचे असून स्वामी चंद्र आहे, हे स्थान व्यय कारक स्थान आहे. या स्थानात मंगळ नीचेचा मानला जातो. अशा ग्रह स्थितीमुळे यांना बाहेरील ठिकाणांपासून खास लाभ प्राप्त होतो. या लोकांना पत्नीची पूर्ण मदत मिळते.