गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (16:23 IST)

चमत्कारी मासर मणी रत्न, धारण केल्याने उजळतं भाग्य

Miracle
आपण पारस मणी, नागमणि, कौस्तुभ मणी, चंद्रकांता मणी, नील मणी, स्यमंतक मणी, स्फटिक मणी इतर रत्नांचे नाव ऐकलं असतील परंतू येथे आम्ही नव रत्नांबद्दल सांगत आहोत- घृत मणी, तैल मणी, भीष्मक मणी, उपलक मणी, स्फटिक मणी, पारस मणी, उलूक मणी, लाजावर्त मणी, मासर मणी. जाणून घ्या मासर मणी धारण केल्याने काय होतं- 
 
1. मासर मणी याला इंग्रजीत एमनी असे म्हणतात.
2. मासर मणी हकीक सारखं दिसतं. याचं रंग श्वेत, लाल, पिवळा व काळा चार प्रकाराचं असतं. हे पंकज पुष्प समान चमकदार व सुगंधित असतं.
3. हे मणी दोन प्रकाराचे असतात. अग्नी मासर व जलवर्ण मासर.
4. अग्नी मासर बद्दल म्हणतात की जर अग्निवर्ण मासर मणी दोर्यारत गुंडाळून अग्नीत टाकल्यास दोरा जळत नाही.
5. जलवर्ण मासर बद्दल असे म्हणतात की जलवर्ण मासर मणी जर पाणी मिश्रित दुधात टाकल्यास पाणी व दूध वेगवेगळं होऊन जातं.
6. असे मानले जाते की अग्नी वर्ण मासरमणि धारण केल्याने व्यक्तीचं अग्नीत दहन होत नाही व जलवर्ण मासर मणी धारण केल्याने व्यक्ती पाण्यात बुडत नाही.
7. मासर मणिच्या प्रभावामुळे भूत, प्रेत, चोर, शत्रू इतरांची भीती नसते.
8. मासर मणी धारण केल्याने लगेच समस्या सुटतात व सर्व प्रकाराचे सुख प्राप्त होतात.
9. हा मणी धारण केल्याने भाग्याची साथ मिळते व सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
10. हा रत्न धारण केल्याने जीवनात सुखं येतं व आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळतं.