1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By

Gajanan Maharaj Miracles गजानन महाराजांनी केलेले चमत्कार

Shri Gajanan Maharaj Vijay Granth Adhyay 6
शेगावातील गजानन महाराज अनेक लीला घडवून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर प्रेमाने जनावराला आपल्या वश मध्ये केले, भक्तांचे दुःख दूर केले. भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडविले, तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले. अशा प्रकारे महाराजांनी अनेक चमत्कार केले. चला तर मग महाराजांच्या काही केलेल्या चमत्कारा विषयी जाणून घेऊ या.
 
* बार्शी टाकली येथे महादेवांच्या देऊळात कीर्तन करीत असतांना टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले.
* पीतांबराने महाराजांच्या आज्ञेवरून गढूळ असलेले ओंढ्यांचे पाणी तुंबाभरून आणल्यावर स्वच्छ झाले.
* जानकीराम सोनाराकडून चिलीम पेटविण्यासाठी विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिल्यावर विना विस्तवाची चिलीम पेटवली.
* जानकीराम सोनाराकडे आलेल्या पाहुण्यांच्या ताटात चिंचवणीत आळ्या आढळल्याने अतिथी जेवणावरून उठून गेले महाराजांना विस्तव न दिल्याने हा प्रकार घडलेला समजतातच सोनाराने महाराजांची क्षमा मागितल्यावर त्याच क्षणी आळ्या नाहीशा झाल्या.
* भास्कर पाटलाची कोरडी विहीर पाण्याने तुडुंब भरली.
* बंकटलालच्या कणसे च्या मळ्यात पेटविलेल्या अग्नीमुळे मधमाश्या सगळ्यांना चावल्या पण महाराजांना काही इजा झाली नाही.
* श्रेष्ठ कुस्तीगीर श्री हरी पाटल्यांच्या शक्तीचे गर्वहरण महाराजांनी केले.
* पाटलांच्या मुलांनी महाराजांच्या पाठीवर ऊस मारल्यावर महाराजांनी हाताने उसाचा रस काढून सर्वांना प्यायला दिला.
* संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.
* जानरावांचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला.
* कारंज्याचा लक्ष्मण घुंडे ह्यांचा आजार देखील महाराजांनी दिलेल्या आंब्याला खाऊन बरा झाला.
* प्लेग चा असाध्य रोगाने आजारी असलेल्या पुंडलिक भोकरेंच्या काखेत महाराजांचा अंगठा लागतातच आरोग्यात सुधारणा झाली. पुंडलिक ह्यांना आपल्या पादुका दिल्या.
* बाळापूरचे समर्थ रामदासाचे भक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईंना श्रींनी समर्थाच्या रूपात दर्शन दिले.
* अमरावतीच्या गणेश अप्पाना घरी जाऊन भेट दिली.
* पंढरपुरात महाराज असताना बापूराव काळे नावाच्या भक्ताला महाराजांनी प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घडवून दिले.
* नर्मदेचे जल प्रवासात नावेत पाणी शिरल्यावर नर्मदेने कोळिणीचे रूप घेऊन नाव नदी काठी लावली आणि प्रवाशांना वाचवले.
* बंडू तात्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
* सुकलालच्या द्वाड गायीला शांत केले.
* ब्रह्मगिरीचे गर्वहरण केले.
* लोकमान्य ह्यांना तुरुंगवास होण्याचे भाकीत सांगितले.
* मथुरबाबूंना शिव आणि श्रीरामकृष्ण असे रूप दर्शनास आले.
* गंगाभारतीच्या सर्वांगावर आलेला कुष्ठरोग महाराजांच्या कृपेने नाहीसा होणं.
 
या व्यतिरिक्त महाराजांनी मृत कुत्र्याला जिवंत केले. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेचा प्रवास करणे सारख्या लीला केल्या. 'गणि गण गणात बोते' हे भजन ते म्हणायचे त्या मुळे लोक त्यांना गजानन महाराज संबोधित करावयाचे. दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराज शेगावातच समाधिस्त झाले.