शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

तुमच्यातील वाईट सवय सांगेल तुमची राशी

तुम्ही कधी या गोष्टीवर विचार केला आहे की आपली नजर वृत्तपत्रावर बातम्यांबरोबर आजचे दैनिक राशीफलवर न चुकता जाते. कारण आपल्याला जाणून घ्यायचे आहे की आपला आजचा दिवस कसा जाईल, पण आम्ही तुम्हाला राश्यांशी निगडित त्या गोष्टींबद्दल सांगत आहोत जे जाणून घेणे कदाचित तुम्हाला आवडणार नाही, कारण हे तुमचे दैनिक राशीफल नाही आहे बलकी ह्याच राशींच्या माध्यमाने तुमच्यातील वाईट सवय सांगत आहे आणि कुठल्याही माणसाला आपल्यातील वाईट सवय जाणून घ्यायचे नसते. पण ही सवय जाणून घेतल्यानंतर नक्कीच तुमच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. 
मेष राशी
अधिकतर या राशीच्या जातकांना राग फार लवकर येतो आणि रागाच्या भरात हे स्व:च नुकसान करू घेतात.  
 
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांमध्ये ईर्ष्याची भावना जास्त असते, जर यांना वेळ राहता ताब्यात घेतले नाही तर नंतर त्याचा फार त्रास सहन करावा लागतो. 
मिथुन राशी
या राशीचे जातक आपले निर्णय स्वत: घेत नाही आणि मधल्यामध्ये राहून जातात. असे लोक आपल्या जीवनात एखाद्या कुठल्याही गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही बलकी यांचे डोकं चार कामात व्यस्त राहत.

कर्क राशी
या राशीचे जातक फारच मुडी असतात, जेव्हा यांचं मन असत ते गोष्टी करतात आणि नसेल तर हे भांडण्याच्या मूडमध्ये राहतात. खर्‍या शब्दात सांगायचे तर यांचा भरवसा नसतो कारण हे केव्हाही रुसून बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्याचा आधीच त्याचे परिणामाबद्दल विचार करून घाबरून जातात. 
सिंह
या राशीचे जातक आपल्या ध्येयापेक्षा जास्त आपल्या ईगोला प्रार्थमिकता देतात, जर यांना म्हटले की दोघांमधून एकाची निवड करा तर हे आपल्या इगोची निवड करतील. हे आपल्या लोकांशी एवढे प्रेम करतात पण हेच प्रेम दुसर्‍यांनी दाखवलं तर त्यांना त्रास होऊ लागतो.  
कन्या 
असे लोक कडू बोलणे पसंत करतात, हे प्रत्येक गोष्टीत लगेच निर्णय घेणे पसंत करतात.

तूळ  
या राशीचे जातक आपले डोकं प्रत्येक क्षण बदलत राहतात, ज्यामुळे हे आपले वचन पूर्ण करू शकत नाही आणि सगळ्यांशी वाईटपणा  घेऊन घेतात. असे व्यक्ती जास्तकरून आळशी असतात.  
    
वृश्चिक राशी 
या राशीच्या जातकांशी जर चांगला व्यवहार नाही केला तर हे लवकर चिडून जातात. या लोकांमध्ये ईर्ष्याची भावना जास्त असते. हे लोक  कुठली गोष्ट केव्हा मनावर घेतील याचा नेम नाही.  
 
धनू राशी
धनू राशीच्या जातकांमध्ये ओवर कॉन्फिडेंस जास्त असतो आणि कुठल्याही गोष्टीला मनावर न घेता त्याला वार्‍यात उडवून देतात.