शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

जन्म वेळेच्या आधारावर जाणून घ्या मनुष्याचा स्वभाव आणि भविष्य

ज्योतिषच्या मदतीने जन्म वेळेच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाची माहिती मिळू शकते. रात्री जन्म घेणारे आणि दिवसा जन्म घेणार्‍या लोकांमध्ये बरंच अंतर असत. ज्योतिष शास्त्रानुसार रात्री जन्म घेणारे लोक जास्त जोखिमीचे काम करतात तसेच दिवसा जन्म घेणारे लोक कामाच्या प्रती जास्त इमानदार असतात. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घ्या दिवसा आणि रात्री जन्म घेणार्‍या लोकांचा स्वभाव कसा असतो -
 
दिवसा जन्म घेणार्‍या लोकांचा स्वभाव  
 
ज्या लोकांचा जन्म दिवसा होतो ते रात्री जन्म घेणार्‍या लोकांपेक्षा कमी साहसी असतात. हे लोक जोखिमीच्या कामांपासून स्वत:चा बचाव करतात.
 
आरोग्याच्या बाबतीत दिवसा जन्म घेणारे लोक भाग्यशाली असतात. त्यांचे आरोग्य उत्तम राहत.  
 
रात्री जन्म घेणारे थोडे आळसी असतात, पण दिवसा जन्म घेणारे लोक कोणत्याही कामात आळस करत नाही. प्रत्येक काम ईमानदारीने करणे पसंत करतात.  
 
हे लोक भावुक असतात, दुसर्‍यांचे त्रास बघू शकत नाही, आणि प्रत्येक वेळेस मदत करण्यास तयार असतात.  
 
या लोकांची देवावर पूर्ण श्रद्धा असते आणि हे धार्मिक प्रवृत्तीचे असतात.  
 
ज्या लोकांचा जन्म दिवसा होतो, ते लोक प्रत्येक काम शांतीने करणे पसंत करतात.  
 
रात्री जन्म घेणार्‍या लोकांपेक्षा या लोकांमध्ये राग थोडा कमी असतो. यांचा राग लवकर शांत होतो.   
 
घर-परिवार आणि समाजात यांना मान सन्मान मिळतो.  
 
आपल्या कर्मासोबत हे लोक भाग्यावर देखील विश्वास ठेवतात.  
 
जोडीदाराप्रती इमानदार असतात आणि प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात.  
 
रात्री जन्म घेणार्‍या लोकांचा स्वभाव 
 
रात्री जन्म घेणार्‍या लोकांच्या पत्रिकेत गुरु आणि राहू मजबूत असतो. ज्यामुळे यांना पैशांची कमी नसते.  
 
या लोकांचा स्वभाव आलोचक असतो. म्हणून हे कोणाची आलोचना करताना मागे बघत नाही.  
 
या लोकांचा स्वभाव दिवसा जन्म घेणार्‍या लोकांच्या तुलनेत जास्त मैत्रिपूर्वक असतो. यामुळे हे मित्र बनवण्यात एक्सपर्ट असतात.  
 
हे लोक दिवसा जन्म घेणार्‍या लोकांच्या तुलनेत जास्त आत्मविश्वासी असतात. यामुळे हे सार्वजनिक जागेवर आपली गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडू शकतात.
 
हे लोक जास्त कल्पनाशील आणि रचनात्मक स्वभावाचे असतात.
 
हे लोक साहसी स्वभावाचे असतात आणि जोखिमीचे काम घेण्यास मागे बघत नाही.
 
हे प्रत्येक समस्येला लवकर ओळखून त्याला लगेचच संपवण्याचा प्रयत्न करतात.