शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 मे 2018 (10:41 IST)

आता डिजिटल सही असलेला सातबारा मिळणार

गावकरी व शेतकऱयांना डिजिटल सही असलेला सातबारा मिळण्यास सुरुवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार गावांतील सातबारे डिजिटल झाले आहेत. त्यापैकी आठ लाख सातबारांवर डिजिटल सही झाली असून १ ऑगस्टपर्यंत राज्यभरातील अडीच कोटी सातबारा शेतकऱयांच्या हाती मिळतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केली.
 

डिजिटल सातबारा उतारा मिळण्यासाठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाकर जाऊन माहिती भराकी. त्यानंतर पीडीएफ स्करूपातील डिजिटल स्काक्षरी असलेला सातबारा दिसेल. सर्क शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्याकर पुन्हा कुठलीही स्वाक्षरी करण्याची गरज नाही. आपली चाकडी (http://mahabhumi.gov.in/aaplichawdi) हे संकेतस्थळ डिजिटल नोटीस बोर्ड असून याकर आपल्या गाकातील जमिनीच्या नोंदणीचे फेरफार, फेरफाराची स्थितीची माहिती उपलब्ध होणार आहे.