बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

ग्रह सांगतात आपल्याला कोणते पदार्थ आवडतात

व्यक्तीच्या खाण्याच्या सवयी बघून हे सहज ओळखता येऊ शकतं की त्या व्यक्तीचा कोणता ग्रह कमजोर आहे. जाणून घ्या कसं: 
 
* लाल किताब प्रमाणे गुरु कमजोर असल्यास त्या व्यक्तीला पिवळे पदार्थ अधिक आवडतात. असे लोकं चण्याची डाळ किंवा त्याने तयार पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करतात.
 
* कमजोर मंगळ असलेल्या व्यक्तींना मसूर डाळ, मध आणि लाल मिरजी आवडते. तसेच हे लोकं गोड पदार्थही पसंत करतात.
 
* कुंडलीत सूर्य कमजोर असल्यास नमकीन पदार्थाची आवड असते. अधिक मीठ असलेले पदार्थ अश्या लोकांना आवडतात.
 
* चंद्रमा आणि शुक्र दोघांचा रंग पांढरा आहे. ज्याच्या जन्म कुंडलीत चंद्र किंवा शुक्र कमजोर असतं ते दूध, दही, भात, खडी साखर आणि आइसक्रीम पसंत करणारे असतात.
 
* उडद, तीळ, खिचड़ी, सरसो तेल इत्यादीचे कारक शनी मानले आहेत. कमजोर शनी असणार्‍यांना तेलकट पदार्थ खूप आवडतात. शनीच्या दशेत तेलकट पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन कुप्रभाव करण्यात मदत करतं.
 
* बुध कमजोर असणारे मुगाची डाळ, हिरव्या भाज्या आणि मटार पसंत करतात.